अमेरिकेच्या बॅलेट रिसिटवर झळकली हिंदी
By Admin | Updated: November 10, 2016 19:03 IST2016-11-10T19:03:27+5:302016-11-10T19:03:27+5:30
अध्यक्षीय निडणुकीत मतदान करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बॅलेट रिसिटवर इतर भाषांबरोबरच हिंदीलाही स्थान देण्यात आले होते.

अमेरिकेच्या बॅलेट रिसिटवर झळकली हिंदी
ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 10 - देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यावरून अनेक मतमतांतरे असली तरी नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत हिंदीलाही मानाचे स्थान मिळाले. या अध्यक्षीय निडणुकीत मतदान करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बॅलेट रिसिटवर इतर भाषांबरोबरच हिंदीलाही स्थान देण्यात आले होते.
अभिनेते ऋषी कपूर यांनी अमेरिकन निवडणुकीतील बॅलेट रिसिटचे छायाचित्र प्रसारित केले आहे. अमेरिकेत सुमारे 32 लाख भारतीय वंशाचे नागरिक राहतात. त्यामुळे तेथे इतर परकीय भाषांप्रमाणेच हिंदीही बऱ्याच प्रमाणात बोलली जाते.
Hindi was an official language on the US Ballot receipt paper. pic.twitter.com/UlOtECoKsy
— Rishi Kapoor (@chintskap) 10 November 2016