नवी दिल्ली- अमेरिकेनं भारताबरोबर होणा-या बैठका काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित केल्या आहेत. अमेरिकन प्रशासनानं यासाठी खेदही व्यक्त केला आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान 6 जुलै रोजी बैठका आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण सहभागी होणार होत्या. परंतु आता या बैठका होणार नाहीत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, पॉम्पिओ यांनी सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली आणि काही अपरिहार्य कारणांमुळे ही बैठक होणार नसल्याचे सांगत खेदही व्यक्त केला. लवकरच परस्पर सहमतीनं भारत आणि अमेरिकेदरम्यान चर्चा होणार असल्याचंही रवीश यांनी सांगितलं. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निकी हॅले या सध्या भारताच्या दौ-यावर आहेत. धार्मिक स्वातंत्र्याप्रमाणेच नागरिकांचे अधिकारही महत्त्वाचं असल्याचं निकी हॅले म्हणाल्या होत्या.
अमेरिकेनं भारताबरोबरची बैठक केली स्थगित, जाणार होत्या सुषमा आणि निर्मला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 13:07 IST