शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाच्या 'त्या' फ्लाइटमध्ये 9B सीटच नाही, लघुशंका प्रकरणाला नवा ट्विस्ट; वकिलाच्या दाव्यानं खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 16:48 IST

एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा यांच्यावर चार महिन्यांसाठी बंदी घालण्याच्या एअरलाइन्सच्या निर्णयावर आरोपीच्या वकिलांनी असहमती व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली-

एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा यांच्यावर चार महिन्यांसाठी बंदी घालण्याच्या एअरलाइन्सच्या निर्णयावर आरोपीच्या वकिलांनी असहमती व्यक्त केली आहे. आरोपी शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी शुक्रवारी दावा केला की एअर इंडियानं आपल्या 'दोषपूर्ण' अहवालात गोष्ट रचली आहे. कारण शंकर मिश्रा यांनी सीट 9A वर बसलेल्या तक्रारदारावर लघुशंका केली हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण एअर इंडिया देऊ शकलेलं नाही, असा दावा आरोपीच्या वकिलांना केला आहे.

एअर इंडियातील लघुशंका प्रकरणावर DGCA ची मोठी कारवाई! Air India'वर ३० लाखांचा दंड, पायलटचे लायसन्स सस्पेंड

"विमान कंपनीनं कथा रचली आहे की शंकर मिश्रा सीट 9B वर बसले होते आणि त्या सीटवर उभे राहून त्यांनी 9A वर बसलेल्या प्रवाशावर लघुशंका केली, पण मूळात फ्लाइटमध्ये 9B सीटच नाही", असा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. 

एअर इंडियाला ३० लाखांचा दंडहवाई वाहतूक नियामक DGCA ने न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइट दरम्यान एका प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघवी केल्याच्या घटनेच्या संदर्भात एअर इंडियाला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. DGCA ने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनानुसार ज्या दिवशी संबंधित घटना घडली त्या विमानाच्या मुख्य पायलटचा (पायलट इन कमांड) परवाना देखील तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. 

यासोबतच, २६ नोव्हेंबर २०२२ रोजी घडलेल्या घटनेच्या संदर्भात कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांना तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

एअर इंडियाला मिळाली होती नोटीस४ जानेवारीला ही बाब डीजीसीएच्या निदर्शनास आल्यानंतर एअर इंडियाला नोटीस बजावण्यात आली. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नियामकाने विमान कंपनीवर कारवाई केली आहे.

गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइट दरम्यान शंकर मिश्रा नावाच्या प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. एअर इंडियाने एक दिवस अगोदर मिश्रा यांच्यावर चार महिन्यांसाठी विमान प्रवास करण्यास बंदी घातली होती. यापूर्वी, एअरलाइन्सने ३० दिवसांची प्रवास बंदी घातली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर मिश्रा यांना अटक करण्यात आली. आता आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. DGCA ने सांगितले की एअरलाइन्स व्यवस्थापनाने त्यांच्या नोटीसला पाठवलेल्या उत्तराची समीक्षा केली गेली आणि हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया