केंद्र सरकार बदलणार युरिया धोरण
By Admin | Updated: January 20, 2015 02:27 IST2015-01-20T02:27:55+5:302015-01-20T02:27:55+5:30
युरिया उत्पादन वाढीसाठी सरकार यासंदर्भातील धोरणात व्यापक बदल करण्याच्या तयारीत आहे.

केंद्र सरकार बदलणार युरिया धोरण
नवी दिल्ली : युरिया उत्पादन वाढीसाठी सरकार यासंदर्भातील धोरणात व्यापक बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या युरियाच्या दरात वाढ करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. दरम्यान, डिझेल, गॅसनंतर सरकार आता युरियाही नियंत्रणमुक्त करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे, असे सूत्रांनी सांगितले. आगामी तीन वर्षांत युरिया नियंत्रणमुक्ती निर्णयाची अंमलबजावणी केली जाण्याचे संकेत आहेत.
सध्या युरियावर सरकारचे नियंत्रण असून यावर प्रचंड प्रमाणात अनुदान दिले जाते. सध्या अनुदानासह ५,३६० रुपये प्रतिटन या दराने सरकार युरियाची विक्री करत आहे.
हमीभाव व कारखान्यांचा उत्पादन खर्च यातील फरक केंद्र सरकार अनुदानच्या माध्यमातून
देते.
सरकारकडून ही रक्कम थेट संबंधित कंपन्यांना दिली जाते. युरियाच्या संभाव्य नियंत्रणमुक्तीबाबत विचारले असता एका उच्चपदस्थ सूत्राने सांगितले की, युरियाच्या किमती न वाढवता या क्षेत्रात दूरगामी सुधारणा केल्या जातील. दरवाढ होऊ नये यासाठी उपाय योजले जातील.