उपनगरांतील रिकाम्या जागांवर नगरविकास योजना जाहीर कराव्यात

By Admin | Updated: February 3, 2016 00:28 IST2016-02-03T00:28:54+5:302016-02-03T00:28:54+5:30

पुणे: शेती झोन निघून निवासी झोन झालेल्या अनेक जागा उपनगरांमध्ये आहेत. त्या सर्व जागांवर नगर विकास योजना जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. एकाच विशिष्ट परिसराचा विकास करण्याऐवजी हे काम करावे, त्यामुळे संपुर्ण शहराचा विकास होईल असे प्रशासनाला सुचवण्यात आले आहे.

Urban development scheme should be announced in vacant seats in suburb | उपनगरांतील रिकाम्या जागांवर नगरविकास योजना जाहीर कराव्यात

उपनगरांतील रिकाम्या जागांवर नगरविकास योजना जाहीर कराव्यात

णे: शेती झोन निघून निवासी झोन झालेल्या अनेक जागा उपनगरांमध्ये आहेत. त्या सर्व जागांवर नगर विकास योजना जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. एकाच विशिष्ट परिसराचा विकास करण्याऐवजी हे काम करावे, त्यामुळे संपुर्ण शहराचा विकास होईल असे प्रशासनाला सुचवण्यात आले आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी याबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे. शेतीझोन असेल तर त्या परिसरातील जागांवर कसलेही बांधकाम करता येत नाही. शहर विकास आराखडा तयार करताना राज्य सरकार, महापालिका यांच्याकडून काही ठिकाणी असलेले शेतीझोन काढून तिथे निवासी झोन असा बदल करण्यात येतो. गेल्या काही वर्षात शहराच्या आसपासच्या उपनगरांमध्ये यामुळे काही हजार एकर जागा रिकामी म्हणजे निवासी झोन झालीआहे. त्या सर्व जागांवर महापालिकेने नगरविकास योजना जाहीर केली तर बांधकाम व्यावसायिकांकडून त्या जागांचा विकास करता येईल असे छाजेड यांचे म्हणणे आहे.
नगरविकास योजना जाहीर झाल्यानंतर त्या जागेवर निवासी किंवा व्यावसायिक बांधकाम करता येऊ शकते. मात्र ते करताना बांधकाम व्यासायिकाला रस्त्यांसाठी १५ टक्के, उद्याने व अशा प्रकारच्या सोयीसुविधा त्या परिसरात देता याव्यात यासाठी ३० टक्के अशी एकूण जागेच्या किमान ४५ टक्के जागा सोडावी लागते. ही जागा महापालिकेच्या मालकीची होते. त्यासाठी महापालिकेला काहीही पैसे द्यावे लागत नाहीत. मुंढवा, येरवडा-संगमवाडी, लोहगाव, पाषाण याठिकाणी शेती झोन बदलून निवासी झोन झालेली किमान २ हजार एकर जागा सध्या उपलब्ध आहे. या जागांवर महापालिकेने नगरविकास योजना जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने छाजेड यांनी केली आहे.
स्मार्ट सिटीमध्ये क्षेत्र विकास याअंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी या परिसराची निवड करण्यात आली आहे. तिथे तब्बल १ हजार कोटी रूपये खर्च करून विकास करण्यात येणार आहे. विकासाची ही पद्धत अयोग्य असून ते करण्याआधी या निवासी झोनमध्ये आलेल्या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा त्यातून संपुर्ण शहराचा विकास होईल असे छाजेड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Urban development scheme should be announced in vacant seats in suburb