शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरी नागरिकांनाही गरजेची वाटते रोजगाराची हमी, 6 महिन्यांपासून बेरोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 09:57 IST

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सर्वेक्षणामधील निष्कर्ष

ठळक मुद्देकोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या शहरी भागातील बेरोजगारी आणि श्रम बाजार धोरणे या विषयावर हे सर्वेक्षण करण्यात आले. यात सहभागी झालेल्या ८२ टक्के उत्तरदात्यांनी ‘रोजगार हमी’ला सर्वोच्च प्राधान्य दिले

नवी दिल्ली : सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांना ज्याप्रमाणे रोजगाराची हमी दिली आहे, तशीच हमी आपल्यालाही मिळावी, अशी भूमिका कोविड-१९ साथीमुळे बेरोजगार झालेल्या शहरातील नागरिकांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या एका सर्वेक्षणात मांडली आहे.

कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या शहरी भागातील बेरोजगारी आणि श्रम बाजार धोरणे या विषयावर हे सर्वेक्षण करण्यात आले. यात सहभागी झालेल्या ८२ टक्के उत्तरदात्यांनी ‘रोजगार हमी’ला सर्वोच्च प्राधान्य दिले. १६ टक्के उत्तरदात्यांनी रोख हस्तांतरणास प्राधान्य दिले.स्वामी धिंग्रा आणि एफजोला कोंडिरोली यांनी लिहिलेल्या या अहवालात म्हटले आहे की, कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर ज्यांना सरकारच्या रोख हस्तांतरण योजनेचा लाभ मिळाला, त्यातील बहुतांश लोकांनीही अर्थसाह्याऐवजी रोजगार सुरक्षेस महत्त्व दिले. 

सध्या केंद्र सरकारकडून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास वर्षातील १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिलेली आहे. गेल्या वर्षी साथीच्या पार्श्वभूमीवर रोजगारासाठी होणाऱ्या नाव नोंदणीत ५० टक्के वाढ झाली होती. त्यामुळे सरकारने या योजनेची तरतूद वाढविली आहे.गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या पहिल्या लाॅकडाऊननंतरही एक सर्वेक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनाॅमिक्सने केले होते. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या श्रमिकांशी ताज्या सर्वेक्षणासाठीही संपर्क साधण्यात आला. त्यातील ४४ टक्के लोकांना पहिल्या लॉकडाऊननंतर १० महिने उलटून गेल्यानंतरही रोजगार नसल्याचे यात आढळून आले. 

नागरिक सहा महिन्यांपासून बेरोजगार अहवालात म्हटले आहे की, शहरातील नागरिक सरासरी सहा महिन्यांपासून बेरोजगार आहेत. सरकारच्या योजनांचा लाभ शहरांतील गरिबांना फार कमी प्रमाणात मिळतो. सर्वेक्षणातील १ टक्क्यापेक्षाही कमी लोकांना योजनांचा लाभ मिळाला असल्याचे आढळून आले. त्यामुळेच अनेक शहरी व्यक्तींना आपल्या रोजगाराला संरक्षण मिळावे असे वाटत आहे.

टॅग्स :jobनोकरीMaharashtraमहाराष्ट्रEmployeeकर्मचारी