शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

UPSC Success Story: ना कोचिंग क्लास, ना जास्तीचा खर्च तरीही IAS बनल्या सर्जना यादव; अशी केली तयारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 08:40 IST

IAS Success Story: देशात दरवर्षी केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या (UPSC) सिविल सर्व्हिस परीक्षेत (Civil Service Exam) लाखो उमेदवार आपलं नशीब आजमावतात.

IAS Success Story: देशात दरवर्षी केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या (UPSC) सिविल सर्व्हिस परीक्षेत (Civil Service Exam) लाखो उमेदवार आपलं नशीब आजमावतात. पण यश जवळपास १ टक्के उमेदवारांना मिळतं. यात बहुतांश असे विद्यार्थी असतात की ज्यांनी कोचिंग क्लासेसवर लाखो रुपये खर्च केलेले असतात. तरीही यश काही प्राप्त होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे या परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य रणनितीच्या माहितीचा अभाव. 

UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठीची रणनिती जाणून घेण्यासाठी खुद्द आयएएस अधिकाऱ्याकडून याची माहिती जाणून घेण्याशिवाय दुसरा कुठला चांगला स्त्रोत असू शकत नाही. त्यात अशा एका आयएस अधिकाऱ्याकडून जिनं यूपीएससी उत्तीर्ण करण्यासाठी ना कोणता कोचिंग क्लास लावला आणि लाखो रुपये देखील खर्च केलेले नाहीत. फक्त आणि फक्त स्वत: अभ्यास करुन या परीक्षेत यश कसं प्राप्त केलं याची कहाणी जाणून घेऊयात. 

दिल्लीच्या आयएएस अधिकारी सर्जना यादव (Sarjana Yadav) यांनी नोकरी सांभाळात आणि कोणताही कोचिंग क्लासवर लाखो रुपये खर्च न करता यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यांनी आपल्या तिसऱ्या प्रयत्नात २०१९ साली सिविल सेवा परीक्षेत देशात १२६ वी रँक प्राप्त केली आणि आयएएस बनल्या. 

विना कोचिंग क्लासनं अशी केली तयारीयूपीएससी परीक्षा अत्यंत कठीण समजली जाते. यासाठी बहुतांश उमेदवार कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतात. यासाठी लाखो रुपये फी देण्यासाठीही तयार असतात. पण सर्जना यादव यांचा याबाबतचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की कोचिंग क्लास लावावा की नाही हे उमेदवाराच्या इच्छेवर अवलंबून आहे. जर तुम्हाला माहित्येय की तुमच्याकडे संपूर्ण स्टडी मटेरियल आहे आणि परीक्षेसाठी तुमची रणनिती उत्तम आहे तर तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवून मेहनत घेऊ शकता. 

पण एखाद्याला वाटत असेल की वर्ग खोलीतील वातावरणात जास्त चांगला अभ्यास होऊ शकतो. त्यामुळे आपण कोचिंग क्लास लावला पाहिजे तर तसा ते निर्णय घेऊ शकतात. पण जर तुम्ही वेळापत्रकाच्या बाबतीत काटेकोर असाल आणि अभ्यासाप्रती प्रामाणिक असाल तर स्वत: अभ्यास करणं खूप चांगला पर्याय ठरतो, असं सर्जना यादव म्हणाल्या. 

नोकरी आणि परीक्षेची तयारीसर्जना यादव यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर त्यांनी 'टीआरआय'मध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली. पूर्णवेळ नोकरीसोबतच, सर्जना यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली, पण पहिल्या दोन प्रयत्नांत त्यांना यश आलं नाही. हार न मानता आणि चुकांमधून शिकून पुन्हा परीक्षेला सामोऱ्या गेल्या. 

परीक्षेची आणखी चांगली तयारी करण्यासाठी त्यांनी 2018 मध्ये नोकरी सोडली. नोकरीमुळे परीक्षेसाठीच्या मेहनतीवर पूर्ण लक्ष देता आलं नाही, असं त्या सांगतात. पण 2018 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिल्यावर पूर्णवेळ परीक्षेची तयारी सुरू केली. वेळ असूनही त्यांनी कोचिंग क्लास लावण्याचा विचार केला नाही. स्वत:च्या अभ्यासावर त्यांनी विश्वास ठेवला. स्व-अभ्यासाच्या माध्यमातून 2019 मध्ये संपूर्ण भारतात १२६ वी रँक मिळवून आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं.

सर्जना यांनी दिल्या टिप्सएका मुलाखतीत उमेदवारांना या परीक्षेची तयारी कशी करावी याच्या टिप्स देताना सर्जना यादव म्हणाल्या की, या परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या क्षमतेनुसार रणनीती आखली पाहिजे. तयारी सुरू करण्याबरोबरच अभ्यासाचे तासही ठरवावेत. या दरम्यान कोणताही विषय खोलवर वाचण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून कोणताही गोंधळ उडणार नाही. अभ्यासक्रम संपल्यानंतर, शक्य तितकी रिवीजन आणि लेखणीचा सराव करा. अपयशाला अजिबात घाबरू नका, मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल.

मॉक टेस्टवर भर द्या (Focus on Mock Test)गरज नसतानाही अनेक इच्छुक सर्व विषयांच्या नोट्स तयार करण्यात बराच वेळ वाया घालवतात, असे सर्जना सांगतात. तथापि, IAS इच्छुकांसाठी मॉक टेस्ट देणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या चुका सुधारण्यासाठी नियमितपणे मॉक टेस्ट द्या. तसेच, जे विषय समजण्यास अवघड आहेत आणि मोठे परिच्छेद आहेत अशाच विषयांच्या नोट्स बनवा. यामुळे तुमचा वेळ वाचेल, असं सर्जना सांगतात. 

दररोज वर्तमानपत्र वाचा (Read News paper Daily)सर्जना सांगतात की या परीक्षेची तयारी करणारे बहुतेक उमेदवार एकतर नोकरी करत आहेत किंवा नुकतेच पदवीधर झाले आहेत. त्यामुळे त्यांना नियमीतपणे वृत्तपत्र वाचण्याची सवय नाही. पण ते खूप महत्वाचे आहे. उमेदवारांनी दररोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी. यासोबतच तुम्ही ऑनलाइन वेबसाइटचीही मदत घेऊ शकता, जिथे चालू घडामोडींची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. सर्जनाचा असाही विश्वास आहे की तुम्ही कमी तास अभ्यास करू शकता, पण गोष्टी पूर्ण मनाने वाचा. जर तुम्ही दर्जेदार अभ्यास केलात तर तुमच्या यशाची शक्यता खूप वाढते, असं त्या आत्मविश्वासाने सांगतात. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी