शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांसाठी योगी सरकारची मोठी घोषणा, 'या' क्षेत्रात बंपर नोकऱ्या देणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 07:50 IST

Yogi Adityanath : मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 हजार पदांच्या भरतीवर शिक्कामोर्तब केले आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशचेयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकार येत्या 5 वर्षांत वैद्यकीय शिक्षण विभागात 57 हजार पदांची भरती करणार आहे. राज्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 10 हजार पदांच्या भरतीवर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या पाच वर्षांत राज्यातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी अनेक कामे केली आहेत.

सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे. हे पाहता एक जिल्हा, एक वैद्यकीय महाविद्यालय या धोरणावर काम सुरू आहे. योगी 2.0 च्या 100 दिवसांमध्ये संभल आणि महाराजगंज जिल्ह्यातील दोन वैद्यकीय महाविद्यालयांशीही सामंजस्य करार करण्यात आला असून लवकरच अन्य दोन जिल्ह्यांतील वैद्यकीय महाविद्यालयांचा सामंजस्य करार होणार आहे.

येत्या पाच वर्षांत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये, संस्था आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 57 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी 2021 मध्ये 45,127 पदांच्या भरतीला मंजुरी दिली होती, ज्यावर विविध टप्प्यात भरती प्रक्रिया सुरू आहे आणि जवळपास पाच हजार पदांसाठी भरती पूर्ण झाली आहे.

वैद्यकीय शैक्षणिक प्रधान सचिव आलोक कुमार यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालये, संस्था आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध श्रेणींच्या एकूण 57 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफचाही 15 हजार पदांवर समावेश आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 10 हजार पदांच्या भरतीला परवानगी देण्यात आली आहे. लवकरच या पदांवर भरती सुरू होणार आहे.

पोलीस ड्रायव्हरसाठी टेस्ट शेड्यूल जारी दुसरीकडे, उत्तर प्रदेश पोलीस किंवा उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती मंडळाने (यूपीपीआरपीबी) आपल्या अधिकृत वेबसाइटवर उत्तर प्रदेश पोलीस ड्रायव्हर पदासाठी कौशल्य चाचणी वेळापत्रक जारी केले आहे. यूपीपीआरपीबी 12 सप्टेंबर 2022 पासून ड्रायव्हर पदासाठी कौशल्य चाचणी घेईल. जारी केलेल्या शॉर्ट नोटिसनुसार, ड्रायव्हर पोस्ट स्किल टेस्ट 12 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत घेतली जाईल. यूपीपीआरपीबी उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी अॅडमिट कार्ड देईल. दरम्यान, उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून उत्तर प्रदेश पोलीस ड्रायव्हर स्किल टेस्ट शेड्यूल 2022 अपडेट डाउनलोड करू शकतात.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनUttar Pradeshउत्तर प्रदेश