शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

GPS झाले जुने, यूपी सरकार आणतंय GIS प्लॅटफॉर्म, प्रवाशांना मिळणार रस्त्यांची अचूक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 13:07 IST

Geographic Information System : उत्तर प्रदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (UP PWD) भौगोलिक माहिती प्रणालीवर (GIS) आधारित या प्लॅटफॉर्मद्वारे, रस्त्यांची योग्य माहिती उपलब्ध होईल

उत्तर प्रदेशातील सार्वजनिक बांधकाम विभागाने (UP PWD) एक शानदार योजना तयार केली आहे. रस्त्यावर प्रवास करताना सुरक्षिततेसह सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (Geographic Information System) आधारित प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना रस्त्याची खरी स्थिती कळणार आहे.

उत्तर प्रदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (UP PWD) भौगोलिक माहिती प्रणालीवर (GIS) आधारित या प्लॅटफॉर्मद्वारे, रस्त्यांची योग्य माहिती उपलब्ध होईल. या प्लॅटफॉर्मवरून प्रवास सुरू करण्यापूर्वी युजर्सना रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल अचूक माहिती मिळू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) प्रधान सचिव नरेंद्र भूषण यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित प्लॅटफॉर्मचा वापर अंतर्गत कार्यांसाठी केला जात आहे, जसे की सिस्टमवरील माहिती खर्च मेट्रिक्ससह अपडेट करणे, इंटरनेट युजर्ससाठी नेव्हिगेशन पॅनेल प्रदान करणे इत्यादी... यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन लाख किलोमीटरचे रस्त्यांचे नेटवर्क असणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य महामार्ग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या इतर रस्त्यांच्या 55,000 किमीची माहिती एकत्र करत आहे, असे नरेंद्र भूषण यांनी सांगितले. 

मूल्यमापन सॉफ्टवेअर प्रणाली 'प्रहरी' सुरूकॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी विभागामार्फत 'प्रहरी' ही तांत्रिक बोली मूल्यमापन सॉफ्टवेअर प्रणाली सुरू करण्यात आली आहे. "ए, बी, सी आणि डी गटांतर्गत सर्व कॉन्ट्रॅक्टर कॅटगरीला दोन वर्षांपूर्वी लाँच केलेल्या सॉफ्टवेअरच्या महत्त्वाबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे," अधिकाऱ्यांने सांगितले. सॉफ्टवेअर आणण्यापूर्वी कॉन्ट्रॅक्टरनी दिलेल्या तांत्रिक बोलीचे मॅन्युअली मूल्यमापन करण्यात आले होते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पक्षपाताच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. प्रहरीने केवळ वैज्ञानिक मूल्यमापन पद्धती आणली नाही तर ही प्रक्रिया निर्धारित कालावधीत पूर्ण केली जाईल आणि सर्वात योग्य बोलीदार निवडला जाईल याचीही खात्री केली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशtechnologyतंत्रज्ञान