शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022 : यूपीत अमित शाहांची रणनीती; जाट समाजाला भाजपाशी जोडण्याचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 21:39 IST

२५० हून अधिक जाट समाजातील लोकांशी शाह यांनी संवाद साधला. या सभेला सामाजिक बंधुता बैठक असं संबोधण्यात आलं होतं.

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचे (Uttar Pradesh Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीची सुरुवात पश्चिम उत्तर प्रदेशातून होणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशात जाट व्होट बँकेचा मोठा प्रभाव आहे. यामुळे आपली स्थिती अनुकल करण्याच्या उद्देशानं भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी दिल्लीत (Delhi) जाट नेत्यांची भेट घेतली. भाजप खासदार परवेश साहिब सिंह यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनानिमित्त २५० हून अधिक जाट समाजातील लोकांशी संवाद साधला. या सभेला सामाजिक बंधुता बैठक असं संबोधण्यात आलं होतं.

यावेळी संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. “उत्तर प्रदेशातूनच तिन्ही राष्ट्रीय निवडणुकांमध्ये जाट समाजानं भाजपची खुप मदत केली आहे आणि विजयही मिळवून दिलाय. जाट आणि भाजपमध्ये अनेक साम्य आहे. भाजप आणि जाट राज्याच्या प्रगतीचा आणि शेतकऱ्यांचा विचारही करतात. दोघेही देशाच्या सुरक्षेचाही विचार करतात. वन रँक वन रँक पेन्शन देण्याचे काम आम्ही वर्षानुवर्षे केले. जाट प्रवर्गातूनच भाजपने तीन राज्यपालही दिले आणि ९ जणांना खासदार केलं. चौधरी चरणसिंग यांच्यानंतर सर्वाधिक आम्ही दिलंय," असंही त्यांनी नमूद केलं. 

राहुल गांधींवरही निशाणाआम्ही शेतकऱ्यांचे ३६ हजार कोटी माफ केले. उसाच्या पैशांबद्दल थोडीफार उणीव असेल ती लवकरच दूर केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. "राहुल गांधींना खरीप आणि रबी पिकांमधला फरकही माहित नाही. अखिलेश यादर सरकारदरम्यान ४२ ऊस कारखाने होते, पण त्यापैकी२२ बंद करण्यात आले. योगी आदित्यनाथ सत्तेत आल्यानंतर उत्तर प्रदेशात एकही हिंसाचार झाला नाही," असंही शाह म्हणाले.जयंत यांच्यासाठी दरवाजा खुलासपा आणि आरएलडीचे सरकार बनले तर आरएलडीचं नाही, तर अखिलेश यांचंच चालेल. तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात. मला कधीही फटकारा पण भाजपला मत द्या. मी पुन्हा सांगतो जयंत यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे. आता काही होऊ शकत नाही. परंतु २०२४ साठी त्यांना समजवा. जर कोणताही वाद असेल तर सोबत बसून सोडवू, बाहेरून कोणालाही बोलावण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं.

जयंत चौधरी यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे. समाजाचे लोक त्यांच्याशी बोलतील, समजावतील. भाजपचा दरवाजा त्यांच्यासाठी कायमच खुला आहे. त्यांनी आमच्याकडे यावं असं आम्हाला वाटत होतं, परंतु त्यांनी निराळा मार्ग निवडल्याचं शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादव