शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

UP Election Result: योगींपुढे चंद्रशेखर आझादचा दारुण पराभव, जाणून घ्या किती मिळाली मतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 14:47 IST

युपीत आता योगी देशाचे भावी पंतप्रधान असल्याच्याही घोषणा देण्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा मोठ्या विजयाच्या दिशेनं आगेकूच करताना दिसत आहे. प्राथमिक कल पाहता भाजपानं बहुमताचा आकडा गाठला आहे. यासोबतच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा आता एका झटक्यात राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर पोहोचली आहे. कारण, युपीत भाजपला मोठं यश मिळालं असून गोरखपूर शहर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ हेही विजयी झाल्याचं दिसून येतं. या मतदारसंघात दुपारी 2.25 मिनिटांच्या वेळेपर्यंत योगी आदित्यनाथ यांना 60,310 मतं मिळाल आहेत.  

युपीत आता योगी देशाचे भावी पंतप्रधान असल्याच्याही घोषणा देण्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाच्या शानदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर गोरखनाथ मंदिराच्या बाहेर जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. भाजपाचे कार्यकर्ते पुष्पवृष्टीच्या माध्यमातून आपला आनंद साजरा करत आहेत. गोरखपूर शहर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज निकालाच्या दिवशी सकाळपासूनच ते निकालात बाजी मारताना दिसून येत आहेत. निवडणूक आयोगने अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार दुपारी 2.25 मिनिटांच्या वेळेपर्यंत योगी आदित्यनाथ यांना 60,310 मतं मिळाल आहेत. 

योगी आदित्यनाथ यांना या मतदारसंघातून म्हणावं अशी कुणीही टस्सल दिली नाही. कारण, योगीनंतर समाजवादी पक्षाच्या शुभावती उपेंद्र दत्त शुक्ला यांना 2.25 वाजेपर्यंत 20,166 मतं मिळाली आहेत. तर आझाद समाजवादी पक्षाचे नेते आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांना केवळ 3,153 मतं मिळाली आहेत. काँग्रेस उमेदवार डॉ. चेतना पांडे यांना केवळ 1092 मतं मिळाली आहेत. तर, बहुजन समाज पक्षाच्या ख्वाजा शमसुद्दीन यांना 3648 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, गोरखपूर शहर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांचा एकतर्फी विजय झाल्याचे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. 

चंद्रशेखर यांची क्रेझ, पण मतदान नाहीच

डोक्यावर निळी पगडी, गळ्यात निळे वस्त्र, चेहऱ्यावर रेबॅनचा गॉगल, भाषणांमध्ये आग... हा आहे योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात लढणारे चंद्रशेखर आझाद यांचा संक्षिप्त परिचय. त्यांची स्टाईल व स्वॅगचे दलित युवक चाहते आहेत, त्यांनी सोशल मीडियातही क्रेझ दिसते. मात्र, चाहत्यांचं हे प्रेम मतदानाच्या पेटीतून व्यक्त झालंच नाही. महाराष्ट्रात १९७२मध्ये दलित पँथरने जशी चेतना जागविली होती, तशीच चेतना ते उत्तर प्रदेशच्या दलितांमध्ये जागवू इच्छित आहेत. त्यावेळी महाराष्ट्रात डॉ. आंबेडकर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रभाव कमी झालेला होता. चंद्रशेखर यांचा उदयही उत्तर प्रदेशात अशाच स्थितीत झालेला आहे.

२०१५ मध्ये भीम आर्मीची स्थापना

उत्तराखंडच्या सीमेवरील छुटमलपूर येथील गोवर्धन दास यांचे पुत्र चंद्रशेखर हे बालपणापासूनच बंडखोर स्वभावाचे. त्यांनी आपल्या गावाबाहेर स्वागताबद्दल एक बोर्ड लावला होता. तो उच्चवर्णीयांना आवडला नव्हता. परंतु त्यांनी पर्वा केली नाही. २०१५ मध्ये त्यांनी भीम आर्मीची स्थापना केली. ते म्हणतात - देशाची आर्मी जशी नागरिकांचे रक्षण करते, तसे भीम आर्मी दलितांच्या हिताचे रक्षण करते. सहारणपूरमध्ये दलितांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी ४०० भीम आर्मी स्कूलची स्थापना केली. यात मुले-मुली एकत्रित शिकतात. ठाकुरांच्या दादागिरीच्या विरोधात त्यांनी अनेकदा आंदोलने केली व जेलमध्येही गेले. त्यामुळेच त्यांनी आपल्या नावात रावण शब्दाला स्थान दिले. राजकारणात आल्यानंतर त्यांनी हे उपनाम हटविले. दुचाकीवरून गावोगावी फिरून ते दलितांमध्ये त्यांच्या अधिकारांची जागृती करतात.

एक पाय जेलमध्ये...

मागील पाच वर्षांत दलितांच्या हितांसाठी आंदोलने केल्यामुळे चंद्रशेखर आझाद यांचा एक पाय जेलमध्ये राहिलेला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची अटक राजकीय असल्याची टिप्पणी करून सुटका करण्याचा आदेश दिला तर योगी सरकारने त्यांना एनएसएनुसार पुन्हा अटक केली होती. 

पोलिसांच्या हातावर तुरी दिल्यानंतर गोल टोपी घालून व शेरवानी परिधान करून ज्या पद्धतीने ते दिल्लीच्या जागा मशिदीत भाषण देण्यासाठी गेले, त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली.

करा किंवा मरा...

आजवर त्यांचे कार्यक्षेत्र सहारणपूर व परिसरातील काही जिल्हे होते. मार्च २०२०मध्ये त्यांनी आझाद समाज पार्टीची स्थापना केली. परंतु आजवर एकही निवडणूक लढविली नाही. ते प्रथमच संपूर्ण राज्यात निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहेत. उत्तर प्रदेशचा जिग्नेश मेवानी त्यांना व्हायचे आहे. ३५ वर्षीय चंद्रशेखर यांच्यासाठी करा किंवा मरा, असा हा क्षण आहे. यशस्वी झाले तर हीरो अन्यथा झीरो बनणे निश्चित आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBhim Armyभीम आर्मीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझाद