UP Election 2022: ज्या ठिकाणी मुलायम सिंह होते शिक्षक; आता तेथून निवडणूक लढणार अखिलेश यादव, सपाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 06:10 PM2022-01-20T18:10:48+5:302022-01-20T18:14:11+5:30

पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही याच विधानसभा मतदारसंघातून आपली पहिली निवडणूक लढवली होती आणि निवडणूक जिंकून ते विधानसभेत पोहोचले होते.

UP Election 2022: Where Mulayam Singh was a teacher; From there, Akhilesh Yadav will contest in the election mainpuri seat  | UP Election 2022: ज्या ठिकाणी मुलायम सिंह होते शिक्षक; आता तेथून निवडणूक लढणार अखिलेश यादव, सपाची घोषणा

UP Election 2022: ज्या ठिकाणी मुलायम सिंह होते शिक्षक; आता तेथून निवडणूक लढणार अखिलेश यादव, सपाची घोषणा

googlenewsNext

सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी आधीच उत्तर प्रदेश निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून अखिलेश निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे वृत्त आहे. आझमगढमधील गुन्नौरमधून अखिलेश निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असा अंदाज आतापर्यंत वर्तवला जात होता. मात्र आज सर्व अंदाजांना पूर्णविराम देत समाजवादी पक्षाने अखिलेश यांची जागा जाहीर केली आहे.

पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनीही याच विधानसभा मतदारसंघातून आपली पहिली निवडणूक लढवली होती आणि निवडणूक जिंकून ते विधानसभेत पोहोचले होते. याशिवाय सपा प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी करहल येथील जैन इंटर कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे आणि ते येथे शिक्षकही राहिले आहेत. मुलायम सिंह यादव यांच्या सैफई या गावापासून करहल केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे.

2017 च्या निवडणुकीत करहल विधानसभा मतदारसंघातून सपाने सोवरण सिंह यादव यांना तिकिट दिले होते. सपाच्‍या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या सोवरन सिंह यादव यांनी प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार रामा शाक्य यांचा 40 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

समाजवादी पक्षाने (एसपी) करहल विधानसभेच्या जागेवर सात वेळा कब्जा केला आहे. या जागेवर 1985 मध्ये दलित मजदूर किसान पक्षाचे बाबूराम यादव, 1989 आणि 1991 मध्ये समाजवादी जनता पार्टी (SJP), 1993, 1996 मध्ये सपाच्या तिकिटावर बाबुराम यादव आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 2000 च्या पोटनिवडणुकीत सपाचे अनिल यादव, 2002 मध्ये भाजप आणि 2007, 2012 आणि 2017 मध्ये सपाच्या तिकिटावर सोवरन सिंह यादव आमदार म्हणून निवडून आले.

Web Title: UP Election 2022: Where Mulayam Singh was a teacher; From there, Akhilesh Yadav will contest in the election mainpuri seat 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.