शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2022 : उत्तर प्रदेशात सपा, बसपाचं राज्य आलं तर पुन्हा माफीया राज येईल - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 16:04 IST

UP Election 2022 : अखिलेश यादव आणि जयंत चौधरी केवळ मतमोजणीपर्यंतच सोबत, अमित शाह यांची टीका

UP Election 2022 : सध्या उत्तर प्रदेशात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह (Amit Shah) यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. उत्तर प्रदेशात जर सपा आणि बसपाचं सरकार आलं तर पुन्हा एकदा माफिया राज येईल. जर तुम्ही भाजपला मत दिलं तर आम्ही उत्तर प्रदेशला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवू असं आश्वासन अमित शाह यांनी दिलं. मुझफ्फरनगरच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी विरोधकांवर निशाणा शाधला.

यावेळी बोलताना त्यांनी मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीची आठवण काढली. "या दंगलीत जे आरोपी होते, त्यांना पीडित दाखवण्यात आलं. पोलिसांनी व्होट बँक ध्यानात ठेवून कारवाई केली. हजारो खोट्या केसेस टाकल्या. या प्रकरणी भाजप दंगलीतील पीडितांसोबत खंबीरपणे उभी राहिली," असं अमित शाह म्हणाले. मुझफ्फरनगर आणि पश्चिम उत्तर प्रदेशची जनता दंगलींना विसरली आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.  "जर तुम्ही त्या दंगली विसरला नसाल तर त्यांना मत देण्याची चूक करू नका. अन्यथा पुन्हा एकदा दंगल घडवणारे लोक सत्तेवर येतील. भाजपच्या कार्यकाळात एकगी दंगल झाली नाही. दंगल घडवणारे तुरुंगात आहेत. भाजपनं कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं आहे. अखिलेश यादव यांना काहीही वाटत नाही. त्यांनी काल या ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली नसल्याचं म्हटलं. आज मी सार्वजनिकरित्या या ठिकाणी आकडेवारी देण्यास आलोय. हिम्मत असेल तर आकडेवारी घेऊन पत्रकार परिषदेत मांडा," असंही ते म्हणाले.

अखिलेश यादवांवर निशाणा"उत्तर प्रदेशात अखिलेश यादवस जयंत यादव मतमोजणीपर्यंतच सोबत आहे. जर सपाचं सरकार स्थापन झालं, तर आझम खान सरकारमध्ये येतील आणि जयंत चौधरी बाहेर होतील," असंही शाह म्हणाले. यावेळी त्यांनी सपा आरएलडीवर निशाणा साधला. त्यांची उमेदवारांची यादीच निवडणुकीनंतर काय होईल हे सांगत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Amit Shahअमित शाहAkhilesh Yadavअखिलेश यादव