शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

UP Election 2022: गोरखपूरमधून योगींचा मार्ग सुकर; निकटवर्तीय राहिलेले शुक्ला यांच्या पत्नी सपाकडून रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 06:16 IST

UP Election 2022: पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विजय निश्चित आहे.

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

गोरखपूर : पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वाट जास्तीत जास्त खडतर करण्यासाठी विरोधी पक्षांनी कोणतीही कसर सोडलेली नसली, तरी  योगी यांचा विजय निश्चित आहे. कधी काळी त्यांचा उजवा हात मानले जाणारे उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नी सुभावती समाजवादी पार्टीकडून आणि आझाद समाज पार्टीचे चंद्रशेखर रावण हे योगींविरुद्ध मैदानात आहेत. बसपाने ख्वाजा मोईनुद्दीन यांना, तर काँग्रेसने चेतना पांडे यांना मैदानात उतरविले आहे. उपेंद्र शुक्ला हे योगी यांचे हनुमान मानले जायचे. निवडणुकीच्या प्रचाराची धुरा शुक्ला यांच्याकडेच होती.

 या जवळिकीमुळेच मुख्यमंत्री झाल्यानंतर योगी यांनी  २०१८ च्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शुक्ला यांना उमेदवारी दिली होती; परंतु, समाजवादी पार्टीचे  प्रवीण निषाद यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता.  त्यानंतर निषाद हे भाजपमध्ये सामील झाल्यानंतर २०१९ मध्ये ते संत कबीर नगर  लोकसभा मतदार संघातून निवडून आले. 

त्यावेळी भाजपने उपेंद्र शुक्ला यांच्याऐवजी रविकिशन यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिली होती. तथापि, शुक्ला यांनी  रविकिशन यांच्या प्रचारात पुढाकार घेतला होता. २०२० मध्ये शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

सर्वाधिक विकास....

गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशात सर्वाधिक विकास गोरखपूरमध्ये झाला. नवीन चकचकीत रुंद रस्ते, २४ तास वीज, प्रत्येक घरात स्वच्छ पेयजल, रामगढ सरोवराचे सौंदर्यीकरण, खताचा कारखाना, एम्स आणि  विमानतळ  हे सर्व गोरखपूरच्या विकासाचे प्रतीक आहे.

योगींना पाठिंबा का?

गोरखनाथ मठाचे महंत म्हणून योगी आदित्यनाथ यांना पूर्व उत्तर प्रदेश व्यतिरिक्त नेपाळमध्येही खूप आदर आहे. तथापि, गोरखपूरध्ये  ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातील ५० वर्षांपासूनच्या संघर्षात ते राजपुतांची बाजू घेताना दिसले; परंतु, यावेळी  हिंदुत्ववादी म्हणून लोक जातीचा विचार न करता त्यांना पाठिंबा देत असल्याचे दिसते.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथ