शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

CM Yogi Delhi Visit: दिल्लीत मोदी-योगी भेट! यूपीत सरकार स्थापनेच्या फॉर्म्युल्यावर झालं मंथन, उपमुख्यमंत्री किती असणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 20:13 IST

CM Yogi Delhi Visit: उत्तर प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यूपी जिंकल्यानंतर ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचले आहेत.

CM Yogi Delhi Visit: उत्तर प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यूपी जिंकल्यानंतर ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांची भेट घेतली. मोदींची भेट घेण्याआधी योगी आदित्यनाथ यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष यांची भेट घेतली. यूपीमध्ये सरकार स्थापनेवर विचारमंथन करण्यासाठी योगी आज दिल्लीत पोहोचले आहेत. यूपीमधील मेगा विजयानंतर त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

या भेटीत दोघांमध्ये सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याचे समजते. यादरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेसोबतच शपथविधीबाबतही चर्चा झाली. दुपारी एक वाजता योगी आदित्यनाथ यांनी संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दिल्लीत योगी भाजपच्या सर्वोच्च नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. बीएस संतोष यांच्यानंतर त्यांनी व्यंकय्या नायडू आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. यानंतर ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचीही भेट घेतली. 

यूपीमध्ये सरकार स्थापनेवर चर्चायूपी विधानसभा निवडणुकीत भाजपने 273 जागा जिंकल्या आहेत. यानंतर राज्यात नवे सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होळीनंतर शपथ घेऊ शकतात. याआधी ते भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाशी सरकार स्थापनेच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. पीएम मोदींसोबत झालेल्या भेटीदरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री योगी यांनी यूपीमध्ये सरकार स्थापनेच्या सूत्रावर चर्चा केली. या भेटीत शपथविधीच्या तारखेबाबतही चर्चा होत आहे.

'निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन'मुख्यमंत्री योगी यांच्या भेटीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे. ट्विटमध्ये पंतप्रधानांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्याचे लिहिले आहे. यासोबतच उत्तर प्रदेश निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदनही केले. गेल्या ५ वर्षात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. येत्या काही वर्षांत ते राज्याला विकासाच्या आणखी उंचीवर नेतील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे पंतप्रधान म्हणाले आहेत.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Narendra Modiनरेंद्र मोदी