शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

UP Assembly Election Results 2022: मथुरेतून उर्जामंत्री श्रीकांत शर्मा आघाडीवर, जाणून घ्या अयोध्या आणि काशीची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 11:07 IST

UP Assembly Election Results 2022: 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मथुरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार श्रीकांत शर्मा विजयी झाले होते.

कानपूर: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Assembly Election Results 2022) मतमोजणी सुरू आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत उत्तर प्रदेशातील सर्व 403 जागांवर मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वांच्या नजरा अयोध्या, मथुरा, काशी या धार्मिक शहरांच्या जागांवर लागल्या आहेत. मथुरेतून उर्जामंत्री श्रीकांत शर्मा आघाडीवर आहेत, तर अयोध्येतून भाजपचे उमेदवार वेदप्रकाश गुप्ता पुढे आहेत. 

काँग्रेसने मथुरा विधानसभा मतदारसंघातून प्रदीप माथूर यांना उमेदवारी दिली होती. प्रदीप माथूर हे मथुरा विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2002, 2007 आणि 2012 च्या विधानसभा निवडणुकीत ते या जागेवरून विजयी झाले आहेत. मात्र 2017 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता पुन्हा त्यांच्याकडे या जागेचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहे. श्रीकांत शर्मा हे काँग्रेसचे उमेदवार प्रदीप माथूर यांच्यापेक्षा 4000 हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. बहुजन समाजवादी पक्षाचे एसके शर्मा 935 मतांसह तिसर्‍या आणि समाजवादी पक्षाचे देवेंद्र अग्रवाल 271 मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

2017 मध्ये भाजपने मथुरा ताब्यात घेतला2017 च्या विधानसभा निवडणुकीत मथुरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार श्रीकांत शर्मा विजयी झाले. त्यांना निवडणुकीत 143361 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार प्रदीप माथूर यांना 42200 मते मिळाली. या निवडणुकीत श्रीकांत शर्मा 101161 मतांनी विजयी झाले होते.

मथुरा जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण पाच जागा आहेत, ज्यामध्ये छत्र, बलदेव, गोवर्धन, मथुरा सदर आणि मंत या जागा आहेत. आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांच्यासह सपा अध्यक्ष अखिलेश यादव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मथुरेत सपा दोन जागांवर तर आरएलडी तीन जागांवर निवडणूक लढवत आहे.

अयोध्येतून भाजपचे वेदप्रकाश गुप्ता आघाडीवर अयोध्येत विधानसभेच्या पाच जागा आहेत. अयोध्या जिल्ह्यात दरियाबाद, रुदौली, मिल्कीपूर, बिकापूर आणि अयोध्या या पाच विधानसभेच्या जागा आहेत. अयोध्या विधानसभेतून भाजपचे उमेदवार वेदप्रकाश गुप्ता 2100 मतांनी आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे तेज नारायण 2985 मतांसह दुसऱ्या तर बहुजन समाज पक्षाचे रवि प्रकाश 353 मतांनी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यूपीच्या नोएडा विधानसभेच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर भाजपचे उमेदवार पंकज सिंह 3074 मतांच्या फरकाने पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे सपाचे उमेदवार सुनील चौधरी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२BJPभाजपा