शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election Result 2022: जिथे शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्यात आलं त्या लखीमपूर खेरीमध्ये लागला असा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 21:51 IST

UP Assembly Election Result 2022: लखीमपूर खेरीमधील तिकुनिया (Lakhimpur Kheri Violence ) येथे केंद्रीयमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्या कारने चिरडल्याने काही शेतकरी आँदोलकांचा मृत्यू झाला होता. त्याविरोधात मोठा जनक्षोभ उसळला होता.

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने बंपर विजय मिळवला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली. दरम्यान, शेतकरी आंदोलनादरम्यान लखीमपूर खेरी येथे झालेल्या घटनेमुळे उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका झाली होती. लखीमपूर खेरीमधील तिकुनिया येथे केंद्रीयमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांच्या कारने चिरडल्याने काही शेतकरी आँदोलकांचा मृत्यू झाला होता. त्याविरोधात मोठा जनक्षोभ उसळला होता. दरम्यान, जिथे ही घटना घडली होती. त्या निघासन मतदारसंघात आणि लखीमपूर खेरी लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले आहेत.

लखीमपूरमध्ये ज्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्याच्या पुत्राच्या गाडीने चिरडले त्या जागेचे नाव तिकुनिया होते. तिकुनिया हे ठिकाणी निघासन विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे. या ठिकाणी भाजपाच्या शशांक वर्मा यांनी विजय मिळवला आहे. तप समाजवादी पक्षाचे आरएस कुशवाहा दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर बसपाचे आरएस उस्मानी तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

लखीमपूर खेरीमध्ये एकूण आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. येथील पलिया, निघासन, गोला, श्रीनगर, धौरहरा, लखीमपूर, कास्ता आणि मोहम्मदी. या सर्व आठ मतदारसंघात भाजपाने विजय मिळवला आहे. लखीमपूर खेरीमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान झाले. येथे एकूण ६२.४५ टक्के मतदान झाले होते.

लखीमपूर खेरीमधील पलियामध्ये भाजपाचे हरविंदर सिंह साहनी रोमी, कास्ता विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे सौरव सिंह सोनू, धौराहरामधून भाजपाचे विनोद शंकर अवस्थी, श्रीनगरमधून भाजपाचे मंजू त्यागी.  त्याशिवाय गोला येथून भाजपाचे अरविंद गिरी, तर निघासन येथून शशांक वर्मा विजयी झाले.  लखीमपूर सदर येथून योगेश वर्मा आणि मोहम्मदी येथून लोकेंद्र प्रताप सिंह यांनी विजय मिळवला. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारBJPभाजपाPoliticsराजकारण