शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022:कुणाचा झेंडा घेऊ हाती? नेत्यांच्या पक्षांतरामुळे कुटुंबांमध्ये भाऊबंदकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 06:16 IST

UP Assembly Election 2022: राजकारण रक्ताची नातीही पातळ करतात. एकाच घरात दोन वेगवेगळ्या विचारधारेचे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत अनेक घरांमधील हे वास्तव समोर आले आहे.

- सुरेश भुसारी  नवी दिल्ली : राजकारण रक्ताची नातीही पातळ करतात. एकाच घरात दोन वेगवेगळ्या विचारधारेचे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत अनेक घरांमधील हे वास्तव समोर आले आहे. आता मतदारच ठरवतील, विजयाचा झेंडा कोणाच्या हातात द्यावयाचा.यात सर्वात अधिक गाजलेले घराणे म्हणजे माजी मुख्यमंत्री नेताजी मुलायम सिंह यादव यांचे. त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांची वहिनी अपर्णा यादव यांनी बंड पुकारून भाजपची उमेदवारी मिळविली. त्या लखनौ कँटमधून उमेदवार आहेत. एवढेच नव्हे अखिलेश यादव यांचे मामा प्रमोद गुप्ता यांनीही भाजपचा आसरा घेतला आहे.

भाऊबंदकी उघडया निवडणुकीत भाऊबंदकी दिसणार आहे. मसूद कुटुंब हे काँग्रेसचे निष्ठावान घराणे मानले जाते. पश्चिम उत्तर प्रदेशात प्रभाव असलेल्या इमरान मसूद यांनी काँग्रेसला सोडून समाजवादी पार्टीत प्रवेश केला. त्यांचे बंधू नोमान मसूद यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय लोकदलमध्ये प्रवेश केला. दोघेही भाऊ काँग्रेसमधून निघाले; परंतु एका भावाने सपची वाट धरली, तर दुसऱ्याने रालोदला जवळ केले. 

वडील सपात, कन्या भाजपच्या खासदारबहुजन समाजावर अन्याय होत असल्याचा दावा करीत भाजपला रामराम ठोकणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची कन्या संघमित्रा मौर्य मात्र भाजपच्या बदायूं येथील खासदार आहेत. त्या आता कुणाचा प्रचार करणार हे लवकरच कळणार आहे. परंतु, स्वामी प्रसाद मौर्य यांनी माझी कन्या आपला निर्णय घेण्यास ‘स्वतंत्र’ असल्याचा दावा केला आहे.

पिता व पुत्रींमध्ये द्वंद यात पिता व मुलगीसुद्धा आता एकमेकांविरोधात प्रचार करताना दिसणार आहे. भाजपचे आमदार असलेले विनय शाक्य यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला सलाम ठोकला. भाजपने त्यांची कन्या रिया शाक्य यांनाच बिधुनामधून उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी