शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

UP Assembly Election 2022: हीच निवडणूक ठरविणार योगी आदित्यनाथ यांचे केंद्रातील स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 10:25 IST

UP Assembly Election 2022: पश्चिम उत्तर प्रदेशातील ज्या ५८ मतदारसंघांमध्ये १० फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होत आहे तो भाग म्हणजे उत्तर प्रदेशचा ग्रीन बेल्ट. गेल्या निवडणुकीत तब्बल ५३ जागा भाजपने एकहाती राखल्या.

- गजानन चोपडेगाझियाबाद : पश्चिम उत्तर प्रदेशातील ज्या ५८ मतदारसंघांमध्ये १० फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होत आहे तो भाग म्हणजे उत्तर प्रदेशचा ग्रीन बेल्ट. गेल्या निवडणुकीत तब्बल ५३ जागा भाजपने एकहाती राखल्या. त्यामुळे यंदा ही निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे केंद्रातील स्थान ठरविणारी असणार आहे.

पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी ८१५ उमेदवार रिंगणात असून, सर्वाधिक २७ मथुरा मतदारसंघात आहेत. त्याखालोखाल २३ उमेदवार दिल्लीलगतच्या नोएडातून भाग्य आजमावताहेत. २७० हून अधिक जागांवर ‘कमळ’ फुलणार असल्याचा दावा भाजप गोटातून करण्यात आला आहे. असे झाल्यास हीच बाब योगींच्या पथ्यावर पडून त्यांचा दिल्लीचा मार्ग सुकर होऊ शकतो. 

मोदींनंतर योगी आदित्यनाथ : देशपातळीवर सध्या तरी भाजपकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हाच चेहरा आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक स्पष्ट बहुमताने जिंकल्यास योगी भाजपमध्ये क्रमांक दोनचे नेते ठरतील, अशी प्रतिक्रिया गाझियाबाद शहरातील तरुणांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

माहौल बनेगा धीरे धीरे नोएडापासून तर गाजियाबादपर्यंत कोणत्याही पक्षाचे कुठेही बॅनर किंवा पोस्टर दिसले नाही. निवडणुकीचे वातावरण नाही. लोकंही उघडपणे बोलत नाही. माहौल बनेगा धीरे धीरे, हे मात्र आवर्जून सांगतात. सेक्टरमध्ये वसलेल्या नोएडात कोरोनाच्या काळात अनेकांचा रोजगार हिरावला, व्यवसाय ठप्प झाला. त्याचे पडसाद १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानात उमटतीलही; मात्र त्याचा फटका नेमका कुणाला बसेल, हे आता तरी सांगता येणार नाही. 

काँग्रेसचे मिशन २०२४ काँग्रेस पक्ष या निवडणुकीत स्वबळावर लढत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर या पक्षाचा डोळा आहे. त्यामुळे या निवडणुकीत यश मिळाले नाही तरी चालेल; पण किमान पक्षाचा जनाधार वाढेल, कार्यकर्त्यांची फळी निर्माण होईल. 

८२ मध्ये मोबदला, आता झाला महामार्गगाझियाबादेतील व्यवसायी अंकुर भारद्वाज सांगतात, विजयनगर ते गाझियाबाद महामार्गासाठी १९८२ साली जमीन अधिग्रहित केली. मोबदलाही मिळाला; पण महामार्गाच्या निर्मितीला ३६ वर्षे प्रतीक्षा करावी लागली.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा