शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022: अपक्ष उमेदवार चालवतोय 'मोदी रसोई'!; दररोज शेकडो जणांना देतोय जेवण, होतेय देशभर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 20:39 IST

उत्तर प्रदेशच्या सीतापूर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार साकेत मिश्रा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

सीतापूर-

उत्तर प्रदेशच्या सीतापूर विधानसभा मतदार संघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार साकेत मिश्रा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपानं तिकीट दिलं नाही म्हणून काय झालं साकेत मिश्रा आजही निवडणूक काळात 'मोदी रसोई' नावानं खानावळ चालवत आहेत. 'मोदी रसोई'तून आजंही शेकडो जणांना जेवण ते देत आहेत. साकेत मिश्रा सीतापूर मतदार संघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवाराच्या स्वरुपात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

गेल्या दोन महिन्यांपासून ते 'मोदी रसोई' नावानं खानावळ चालवत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून तिकीट दिलं जाईल अशी अपेक्षा त्यांना होती. पण त्यांना पक्षानं तिकीट दिलेलं नाही. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आणि सोशल मीडियावर देखील याची जोरदार चर्चा होऊ लागली. सध्या साकेत मिश्रा अपक्ष उमेदवार म्हणून आपलं नशीब आजमावत आहेत आणि भाजपा उमेदवाराला पण जोरदार टक्कर देत आहेत. तसंच ते आजही मोदी रसोई नावानं खानावळ चालवत आहेत. 

'मोदी रसोई'वर काय म्हणाले साकेत मिश्रा?"मी गेल्या दोन महिन्यांपासून स्वत: 'मोदी रसोई' चालवत आहे आणि स्वत: जेवण तयार करून नागरिकांना देत आहेत. भाजपाच्या इतर कोणत्याही कार्यकर्त्याला तिकीट दिलं असतं तर माझा काहीच आक्षेप नव्हता. पण ज्या व्यक्तीनं सपासोबत साटंलोटं केलं होतं अशा व्यक्तीला तिकीट दिल्यानं नाराजी आहे. माझं तिकीट कापण्यात मोदी किंवा योगी यांची काहीच चूक नाही. त्याखालील खासदार आणि जिल्हा अध्यक्षांनी मला धोका दिला आहे. तिकीट न देता माझा राजकीय खून केला आहे", असं साकेत मिश्र म्हणाले. 

१४ वर्षांपासून करताहेत भाजपाची सेवाअपक्ष उमेदवार म्हणून साकेत मिश्रा निवडणुकी रिंगणात उतरल्यानं भाजपा उमेदवाराला मोठा धक्का बसणार आहे. तसंच सपाचे चारवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या राधेश्याम जयसवाल यांना ते जोरदार टक्कर देत आहेत. गेल्या १४ वर्षांपासून साकेत मिश्रा भाजपामध्ये होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचं कार्यकर्त्यांसोबत देखील नाळ जोडलेली आहे. पण ऐनवेळी पक्षाकडून तिकीट कापण्यात आल्यामुळे ते नाराज झाले होते. अखेरीस त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपाशी बंडखोरी केली आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा