शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022 "...तर यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही"; योगींनी शेअर केला 'तो' Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:09 IST

Yogi Adityanath And UP Assembly Election 2022 : "उत्तर प्रदेशातील एक लाख गावांमध्ये सर्व घरांमध्ये 24 तास वीज पोहोचवण्यात आली आहे, असे पहिल्यांदाच घडले आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवन कसे बदलले आहे याची काहींना कल्पनाही नसेल."

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी 6 मिनिटांचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. "आता मोठा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या डबल इंजिन सरकारने गेल्या पाच वर्षात जे काही केले आहे ते मोठ्या बांधिलकीने केले आहे आणि जे काही सांगितले आहे, ते तुमच्यावर विश्वास ठेऊन केले आहे" असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. "या निवडणुका येईपर्यंत तुम्ही सर्व काही पाहिले आणि लक्षपूर्वक ऐकले. मला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. या पाच वर्षांत खूप काही घडले. "

उत्तर प्रदेशातील एक लाख गावांमध्ये सर्व घरांमध्ये 24 तास वीज पोहोचवण्यात आली आहे, असे पहिल्यांदाच घडले आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवन कसे बदलले आहे याची काहींना कल्पनाही नसेल, असे ते पुढे म्हणाले. या 5 वर्षांत खूप काही अभूतपूर्व घडले आहे. जनतेने सावध राहा. तुम्ही चुकलात तर सर्व मेहनतीवर पाणी फिरेल आणि यावेळी यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही. मी इथे मत मागायला आलो नाही. पण 70 वर्षात हे काम पूर्वीच्या सरकारांना करता आले नाही, याबद्दल मी त्यांची माफी मागतो. आम्ही घरोघरी कोट्यवधी घरांमध्ये शौचालये बांधली, तुमची मते मिळवण्यासाठी हा माझा जुगाडही नव्हता."

"स्वच्छतेपेक्षाही माझ्यासाठी माता-भगिनींच्या सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न होता. प्रथमच लाखो घरे व कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत. त्यांच्या डोळ्यातील चमक अतिशय बोलकी आहे. यापुढे शेकडो निवडणुकांतील विजयाही फिका आहे, असे ते बोलले. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण आजपर्यंत चुलीवर काम करणाऱ्या आमच्या माता-भगिनी आता आजारी पडणार नाहीत, निरोगी असतील. आयुष्मान योजना आज उत्तर प्रदेशातील कोट्यवधी कुटुंबांसाठी आजारांना तोंड देण्यासाठी आधार बनली आहे. 'हर घर नल' योजनेच्या माध्यमातून आम्ही घराघरात पाणी पुरवठा करत आहोत."

"उत्तर प्रदेशात कोणीही उपाशी झोपणार नाही"

"एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यात द्रुतगती मार्ग टाकत आहोत, राज्यभर औद्योगिक कॉरिडॉर उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे तुम्ही पाहिले आहे. याच दरम्यान, 2 वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसच्या भयंकर महामारीने थैमान घातले आहे. सर्वात मोठे श्रीमंत आणि प्रगत देश देखील हतबल दिसले. जगभर हाहाकार माजला. लोकं रोगाने नाही पण उपासमारीने नक्कीच मरतील, असे वाटत होते. पण उत्तर प्रदेशात कोणीही उपाशी झोपणार नाही, असे आम्ही ठरवले. आम्ही कोट्यवधी कुटुंबांना रेशन द्यायला सुरुवात केली" असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाPoliticsराजकारण