शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022: नवीन दलित नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न, समाजवादी पार्टी, भाजपचा मायावतींना शह?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 06:24 IST

UP Assembly Election 2022: गेली दहा वर्षे सत्तेबाहेर असलेल्या मायावती यांना पर्याय म्हणून समाजवादी पार्टी आणि भाजप नवीन दलित नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे.

- शरद गुप्ता नवी दिल्ली :  गेली दहा वर्षे सत्तेबाहेर असलेल्या मायावती यांना पर्याय म्हणून समाजवादी पार्टी आणि भाजप नवीन दलित नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून हे दोन्ही पक्ष उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत कांशीराम यांनी संघटित केलेल्या मतपेढीत स्थान निर्माण करू पाहत आहेत.

भाजपने गेल्या दोन वर्षांत दलित नेत्यांची एक फळी उभी केली आहे. यात  जाटवसह पासी, धानुक, कुर्मी, वाल्मीकी, कोइरी, निषाद या सारख्या दलित आणि अति मागास जाती समुदायाचेही प्रतिनिधित्व आहे. मायावती यांच्या कार्यशैलीमुळे समाजवादी पार्टी आणि भाजपला वाटते की, बसपात लवकरच फुट पडू शकते. २०१४ नंतर जाटवेतर दलित बसपापासून वेगळे होऊन भाजपसोबत गेले आहेत. आता या पक्षांची नजर राज्यांतील जाटव मतदारांवर आहे.

केंद्र सरकारमध्ये दलित समुदायाचे १२ मंत्री असून यापैकी तीन उत्तर प्रदेशचे आहेत.  यात कायदा राज्यमंत्री एस. पी. बघेल सिंह, नागरी गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर आणि सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांचा समावेश आहे.

अलीकडेच उत्तराखंड राज्यपालपदाचा राजीनामा देऊन आग्रामधून निवडणूक लढविणाऱ्या बेबी रानी मौर्य आणि सहा महिन्यांपूर्वी राज्यसभेवर निवडून आलेले माजी पोलीस महासंचालक बृजलाल आणि पंधरा दिवसांपूर्वी कानपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढविणारे असीम अरुण यांना जाटव समुदायाचे मोठे नेते म्हणून पुढे केले जात आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री आणि   इटावाचे लोकसभेतील खासदार रामशंकर कठेरिया, विनोद सोनकर आणि दिनेश खटिक हे अनुक्रमे धानुक, सोनकर आणि खटिक समुदायाचे प्रतिनिधित्व करतात.

इंद्रजित सरोज, के. के. गौतम यांना केले पुढे...- समाजवादी पार्टीनेही माजी खासदार इंद्रजित सरोज, के. के. गौतम आणि सावित्रीबाई फुले यांना दलितांचे नेते म्हणून पुढे केले आहे.-   दुसरीकडे तरुण नेत्यांत अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष राहिलेले चंद्रशेखर चौधरी यांना समाजवादी बाबासाहेब वाहिनीचे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले आहे, तर राम निर्मल यांना समाजवादी लोहिया वाहिनीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.  - राहुल भारती यांना समाजवादी पार्टीच्या अनुसूचित जाती समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे.

टॅग्स :mayawatiमायावतीUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी