शिरसोलीत शाळा इमारत कोनशिलेचे अनावरण
By Admin | Updated: February 2, 2016 00:15 IST2016-02-02T00:15:34+5:302016-02-02T00:15:34+5:30
फोटो-

शिरसोलीत शाळा इमारत कोनशिलेचे अनावरण
फ टो-जळगाव : शिरसोली येथील माध्यमिक शिक्षण विद्या मंडळ संचलित खाजगी प्राथमिक शाळेच्या इमारतीचे कोनशिला अनावरण जगन शंकर तायडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कस्तुराबाई बारी यांच्या हस्ते पूजा, अनंत वाणी यांच्या हस्ते उद्घाटन तर गणपती शंकर कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वालन झाले. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष रा.ना.बारी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सदस्य प.स.सदस्य लता बारी, यशवंत फुसे, सरपंच अर्जुन काटोले, कमलबाई भिल, बळवंत पाटील, व्दारकाबाई बोबडे, राजेश बुंधे, पोलीस पाटील श्रीकृष्ण वराडे, शरद पाटील, जगतराव पाटील, अनिल मराठे, श्रावण ताडे, सुरेश काटोले, पी.एल.काटोले, पंच मंडळाचे अध्यक्ष रंगराव बारी, बंडू अस्वार आदी उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.