आप’ची मान्यता रद्द करा; याचिका हायकोर्टाने फेटाळली
By Admin | Updated: March 20, 2015 01:32 IST2015-03-20T01:32:29+5:302015-03-20T01:32:29+5:30
आम आदमी पार्टीची (आप) मान्यता रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.

आप’ची मान्यता रद्द करा; याचिका हायकोर्टाने फेटाळली
‘आप’ची मान्यता रद्द करा; याचिका हायकोर्टाने फेटाळली
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीची (आप) मान्यता रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.
निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.
हंसराज जैन यांनी संबंधित याचिका दाखल केली होती. ‘आप’च्या काही सदस्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेले निवासी पत्ते आणि त्यांचे मतदार ओळखपत्र वा आयकर रिटर्नमधील पत्ते यांच्यात फरक असल्याचा दावा केला होता. आयोगाने ‘आप’ला घाईत मान्यता दिल्याचेही म्हटले होते.