उन्नाव बलात्कार प्रकरण : आरोपी सेंगरचे सत्तेचे संरक्षण हटवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 06:38 AM2019-07-31T06:38:18+5:302019-07-31T06:38:23+5:30

उन्नाव प्रकरण; प्रियांका गांधी यांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

Unnao Rape Case: Eliminate the power of the accused Sanger | उन्नाव बलात्कार प्रकरण : आरोपी सेंगरचे सत्तेचे संरक्षण हटवा

उन्नाव बलात्कार प्रकरण : आरोपी सेंगरचे सत्तेचे संरक्षण हटवा

Next

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी उन्नावप्रकरणी भाजपला लक्ष्य केले. या प्रकणातील आरोपी भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर आणि त्याच्या भावाला भाजपने दिलेले राजकीय संरक्षण काढून टाका, असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले.

प्रियांका गांधी यांनी असा सवाल केला की, सेंगरसारख्या व्यक्तीला राजकीय संरक्षण का दिले जाते? दुसरीकडे, पीडित महिलेला आपली लढाई लढण्यासाठी एकटीला का सोडून देण्यात येते? पंतप्रधान मोदीजी, कृपा करून आरोपी आणि त्याच्या भावाला मिळत असलेले राजकीय संरक्षण हटवा. अजून खूप वेळ झालेला नाही, असे टष्ट्वीट त्यांनी केले आहे.

प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, कुलदीपसिंह सेंगरसारख्या व्यक्तीला राजकीय संरक्षण का दिले जाते? उन्नाव प्रकरणातील पीडित आणि वकील हे रविवारी एका कार अपघातात गंभीर जखमी झाले आहेत, तर पीडितेच्या दोन नातेवाईकांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी यामागे कारस्थान असल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी सेंगरसह दहा जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर प्रियांका गांधी यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.
प्रियांका गांधी यांनी नुकत्याच दाखल झालेल्या एफआयआरचा काही भाग टॅग करून म्हटले आहे की, यातून स्पष्ट होते की, या कुटुंबाला धमक्या मिळत होत्या. हा अपघात घडवून आणल्याचा संशय यात व्यक्त करण्यात आला आहे.

पीडित महिलेने लिहिले होते सरन्यायाधीशांना पत्र
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिला व तिच्या कुटुंबियांना खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात डांबण्याच्या धमक्या दिल्याची माहिती उजेडात आली आहे. आम्हाला धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करावी, असे पत्र पीडित महिलने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना तिचा अपघात होण्याच्या आधी लिहिले होते.

च्हिंदी भाषेत असलेले हे पत्र वाचून त्याच्यावर एक टिपण तयार करण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सेक्रेटरी जनरलना दिले होते. पीडित महिला व तिच्या कुटुंबातील दोन सदस्यांनी १२ जुलैला हे पत्र लिहिले आहे.
च्पीडित महिलेच्या आईची राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी मंगळवारी भेट घेऊन अपघात कसा झाला याची माहिती घेतली. कुलदीप सेनगर याला याआधीच भाजपमधून निलंबित केले आहे, असे उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह यांनी म्हटले आहे.

Web Title: Unnao Rape Case: Eliminate the power of the accused Sanger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.