शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

PM Wi-Fi योजनेला मंजुरी, 1 कोटी डेटा सेंटर उघडणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 16:40 IST

To unleash Wi-Fi revolution in India : बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि संतोष गंगवार यांनी मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली.

ठळक मुद्देसरकारकडून डेटा कार्यालय, डेटा अ‍ॅग्रीगेटर, अ‍ॅप सिस्टमसाठी सात दिवसांत केंद्रे उघडण्याची परवानगी  दिली जाईल, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले.

नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांकडून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि संतोष गंगवार यांनी मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली.

सरकार देशात 1 कोटी डेटा सेंटर उघडणार आहे. या योजनेचे नाव पंतप्रधान वाय-फाय अॅक्सेस इंटरफेस असे आहे, ज्याद्वारे देशात वाय-फाय क्रांती घडवून आणली जाईल, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत सरकार सार्वजनिक डेटा कार्यालय (पीडीओ) उघडणार आहे. यासाठी कोणताही परवान्याची आवश्यक नाही. कोणतेही सध्याच्या दुकानाला डेटा कार्यालयात रूपांतरित केले जाईल. सरकारकडून डेटा कार्यालय, डेटा अ‍ॅग्रीगेटर, अ‍ॅप सिस्टमसाठी सात दिवसांत केंद्रे उघडण्याची परवानगी  दिली जाईल, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले.

याचबरोबर, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले," लक्षद्वीप बेटांवर फायबर कनेक्टिव्हिटी देखील जोडली जाणार आहे. कोच्चिपासून लक्षद्वीपच्या 11 बेटांवर 1000 दिवसांत कनेक्टिव्हिटी दिली जाईल."

आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेला मंजुरीदेशात आत्मनिर्भर भारत रोजगार योजना लागू केली जाईल, त्या अंतर्गत 2020-2023 पर्यंत एकूण 22 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. या योजनेंतर्गत सुमारे 58.5 लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. मार्च 2020 ते पुढील वर्षापर्यंत ज्या लोकांना नोकरी मिळत आहे, त्यांचे त्यांचे ईपीएफ योगदान सरकारकडून दिले जाईल. ज्या कंपनीमध्ये 1000 पेक्षा कमी कर्मचारी आहेत, त्यांचे 24 टक्के ईपीएफ योगदान सरकार देईल, असे केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

याचबरोबर, संतोष गंगवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी मोदी सरकार सत्तेत आले, त्यावेळी संघटित क्षेत्रात 6 कोटी रोजगार होते, आता त्यामध्ये वाढ होऊन 10 कोटी रोजगार मिळाले आहेत. याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाने आसामच्या अरुणाचल प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये यूएसओएफ (USOF ) योजनेला मान्यता दिली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादPrakash Javadekarप्रकाश जावडेकरWiFiवायफायInternetइंटरनेट