कच्छच्या समुद्रात बेवारस पाकिस्तानी बोट सापडली
By Admin | Updated: February 24, 2016 09:15 IST2016-02-24T09:10:54+5:302016-02-24T09:15:12+5:30
गुजरातमध्ये कच्छच्या सुमद्रात सीमा सुरक्षा दलाने मंगळवारी रात्री एक पाकिस्तानी बोट पकडली.

कच्छच्या समुद्रात बेवारस पाकिस्तानी बोट सापडली
ऑनलाइन लोकमत
कच्छ, दि. २४ - गुजरातमध्ये कच्छच्या सुमद्रात सीमा सुरक्षा दलाने मंगळवारी रात्री एक पाकिस्तानी बोट पकडली. अरबी समुद्रात भारत-पाकिस्तान समुद्र सीमेवरील हरामी नाला भागातून बीएसएफच्या जवानांनी ही बोट जप्त केली.
बीएसएफने ही बोट ताब्यात घेण्यापूर्वीच बोटीवरचे सदस्य निसटण्यात यशस्वी ठरले. या बोटीमध्ये एक बंदूक आणि मच्छीमारीसाठी वापरले जाणारे साहित्य सापडले. जी बंदूक जप्त करण्यात आली आहे तिचा शिकारीसाठी वापर करण्यात येतो.
बीएसएफचे जवान गस्तीवर असताना बेवारस अवस्थेतील ही बोट त्यांच्या नजरेस पडली. सोमवारीही याच भागातून अशीच बेवारस बोट जप्त केली होती. घुसखोरीची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षापथकांनी तपास सुरु केला आहे.