आरोग्य विज्ञान विद्यापीठास आय.एस.ओ. प्रमाणपत्र

By Admin | Updated: May 8, 2014 21:22 IST2014-05-08T21:22:19+5:302014-05-08T21:22:19+5:30

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास टी. यू. व्ही. इंडिया प्रा. लि. संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय.एस.ओ. ९००१ : २००८ प्रमाणिकरण मिळाले आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कामकाजाचे आय.एस.ओ. प्रमाणिकरण व सर्टिफिकेशन प्रक्रियेमुळे प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढणार आहे. यामुळे विद्यापीठाला जागतिक स्तरावर नामांकित विद्यापीठांच्या यादीमध्ये स्थान मिळण्यास मदत होऊन आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊ शकणार असल्याचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले. सदर प्रमाणिकरण प्राप्त करण्यासाठी विद्यापीठातर्फे साधारणत: वर्षभरापासून प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती. सदर प्रमाणिकरण आणि त्याची असलेली गुणवत्ता सातत्याने उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

University of Health Sciences, ISO Certificate | आरोग्य विज्ञान विद्यापीठास आय.एस.ओ. प्रमाणपत्र

आरोग्य विज्ञान विद्यापीठास आय.एस.ओ. प्रमाणपत्र

शिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास टी. यू. व्ही. इंडिया प्रा. लि. संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय.एस.ओ. ९००१ : २००८ प्रमाणिकरण मिळाले आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कामकाजाचे आय.एस.ओ. प्रमाणिकरण व सर्टिफिकेशन प्रक्रियेमुळे प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढणार आहे. यामुळे विद्यापीठाला जागतिक स्तरावर नामांकित विद्यापीठांच्या यादीमध्ये स्थान मिळण्यास मदत होऊन आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊ शकणार असल्याचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी सांगितले. सदर प्रमाणिकरण प्राप्त करण्यासाठी विद्यापीठातर्फे साधारणत: वर्षभरापासून प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती. सदर प्रमाणिकरण आणि त्याची असलेली गुणवत्ता सातत्याने उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ कामकाजाचे आय.एस.ओ. प्रमाणिकरण व सर्टिफिकेशनच्या प्रक्रियेत विद्यापीठ मुख्यालयातील जवळपास ३५ विविध विभाग आणि विद्यापीठाचे मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयांचा समावेश करण्यात आला असल्याचे कुलसचिव डॉ. के. डी. गर्कळ यांनी सांगितले.

Web Title: University of Health Sciences, ISO Certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.