‘शेतकऱ्यांसाठी सर्वंकष विमा योजना लवकरच’
By Admin | Updated: July 13, 2015 00:09 IST2015-07-13T00:09:02+5:302015-07-13T00:09:02+5:30
उशिराने आला असला यंदा देशात पाऊस चांगला होत असून वरुणदेवाच्या या कृपेमुळे महागाई आटोक्यात येईल, असे मत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले

‘शेतकऱ्यांसाठी सर्वंकष विमा योजना लवकरच’
मुंबई : उशिराने आला असला यंदा देशात पाऊस चांगला होत असून वरुणदेवाच्या या कृपेमुळे महागाई आटोक्यात येईल, असे मत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. नाबार्डच्या ३३ साव्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या कृषी आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेत नाबार्डने दिलेल्या योगदानाबद्दल कौतुकाद्गार काढतानाच, कृषीप्रधान अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या बळीराजासाठी नव्या विमा योजनेचे सुतोवाचही जेटली यांनी केले.
ते म्हणाले की, सध्या कृषी विम्यामध्ये कर्जाच्याच कव्हरेजचा विचार मोठ्या प्रमाणावर होतो. पण शेती करण्यासाठी शेतकऱ्यांतर्फे होणाऱ्या लहानगोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत आणि कर्जापासून ते शेतीशी निगडीत अन्य खर्चापर्यंत सर्व खर्चांना विमा कवच देण्याची ही योजना असून त्या लवकरच या योजनेचे स्वरूप, व्याप्ती याची घोषणा करण्यात येईल. इन्फोसिसचे चेअर प्रोफेसर डॉ. अशोक गुलाटी यांनी या संदर्भात सरकारला एक सादरीकरण केले असून त्या अनुषंगाने विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमात नाबार्डचे अध्यक्ष डॉ. हर्ष कुमार भानवाला यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.