जनता परिवाराचे ऐक्य रुळावर
By Admin | Updated: April 6, 2015 01:03 IST2015-04-06T01:03:20+5:302015-04-06T01:03:20+5:30
पूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील सहा पक्षांची एकजूट होणारच यात कोणतीही शंका नसल्याचे राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यात

जनता परिवाराचे ऐक्य रुळावर
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
पूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील सहा पक्षांची एकजूट होणारच यात कोणतीही शंका नसल्याचे राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी रविवारी पाटण्यात स्पष्ट केले. नव्या समाजवादी पक्षाची औपचारिक घोषणा अध्यक्ष मुलायमसिंग यादव हे करतील, असे ते म्हणाले.
आम्ही ‘एक झेंडा एक निशाण’ हा नारा दिला असून भाजपच्या जातीयवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांनीही नव्या समाजवादी पक्षात सहभागी व्हावे असेही आवाहनही त्यांनी केले. भाजपने देशाची फसवणूक केली आहे. हा पक्ष खोटारडा असून फसवणुकीच्या आधारावरच उभा आहे, असेही ते म्हणाले. विलिनीकरणाबाबत शंका नको. एकच चिन्ह असेल. वेगवेगळे चिन्ह ठेवल्यास लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, असे ते पाटण्यात पत्रकारांना माहिती देताना म्हणाले. बिहारात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होत असून त्यासाठी एकजुटीला अंतिम आकार दिला जात आहे.