शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

Kerala Floods: केरळच्या आपत्ती निवारणासाठी यूएईकडून तब्बल 700 कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 13:07 IST

Kerala Floods: केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) तब्बल 700 कोटींची मदत करण्यात आल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी दिली.

तिरुवनंतपुरम : केरळमधील महापुराच्या आपत्ती निवारणासाठी सर्वच स्तरातून मदत करण्यात येत आहे. केरळच्या मदतीसाठी देशासह जगातील इतर देशांनी पुढाकार घेतला आहे. महापुराच्या संकटात अडकलेल्या केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) मोठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. 

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीकडून (यूएई) तब्बल 700 कोटींची मदत करण्यात आल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी दिली. तसेच, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत केरळमधील महापूर, पुनर्वसन व पुनर्बांधणीसंबंधी चर्चा करण्यासाठी येत्या 30 ऑगस्टला विशेष अधिवेशन घेण्याची शिफारस राज्यपाल यांच्याकडे करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी सांगितले. 

 

ऑगस्टच्या पावसाचा 87 वर्षांतील उच्चांकहवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या 87 वर्षांनंतर यंदा ऑगस्ट महिन्यात असा विक्रमी पाऊस पहिल्यांदाच पडला आहे. 1 ते 20 ऑगस्टदरम्यान यंदा केरळमध्ये 771 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 87 वर्षांनंतर पहिल्यांदाच इतका पाऊस पडला आहे. हवामान विभागाचे अधिकारी पुलक गुहाठाकुरता यांनी सांगितले की, 1931 साली राज्यात ऑगस्ट महिन्यात 1132 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. हा सर्वाधिक जास्त पावसाचा महिना होता.  

 

केरळमधील जलप्रलय गंभीर आपत्ती घोषित केरळमधील जलप्रलयाला केंद्र सरकारने गंभीर आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या महापुरामध्ये आजपर्यंत 400 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांत पावसाची तीव्रता कमी होणार आहे. 

युएईच्या उद्योजकांकडून 12.5 कोटींची मदतकेरळच्या मदतीसाठी जगभरातून हात पुढे आले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या तीन भारतीय उद्योजकांनी 12.5 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तर युएईने 34 कोटी रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले आहे.

 

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळRainपाऊस