काश्मीरसाठी युनो हा मार्ग नाही
By Admin | Updated: September 28, 2014 03:23 IST2014-09-28T03:23:41+5:302014-09-28T03:23:41+5:30
काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर उकरून काढल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली

काश्मीरसाठी युनो हा मार्ग नाही
मोदींनी पाकला ठणकावले
संयुक्त राष्ट्रे : काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर उकरून काढल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर टीका केली. काश्मीरच्या प्रश्नावर ‘दहशतवादाच्या सावलीशिवाय’ आम्ही पाकिस्तानशी गांभीर्याने द्विपक्षीय चर्चेसाठी तयार आहोत; परंतु त्यासाठी ‘योग्य वातावरण’ तयार असले पाहिजे, असे त्यांनी शनिवारी स्पष्ट केले.
193 सदस्यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मोदी यांचे हे पहिलेच भाषण होते. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांत कर्कशपणो केलेल्या भाषणात काश्मीरमध्ये सार्वमत घेण्यात यावे यावर जोर दिला होता. मोदी या भाषणाचा थेट संदर्भ न देता म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांत काश्मीर प्रश्न उपस्थित करणो हा दोन देशांतील प्रश्न सोडविण्यासाठीचा मार्ग नाही. मोदी म्हणाले ‘‘माङया सरकारने पाकिस्तानसह आमच्या सगळ्या शेजारी देशांशी मैत्री आणि सहकार्य वाढण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.’’ मोदी यांनी हिंदी भाषेत केलेल्या या भाषणात मी पाकिस्तानशी शांततापूर्ण वातावरणात व दहशतवादाच्या सावलीशिवाय
मैत्री आणि सहकार्य वाढविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करीत आहे.
तथापि, पाकिस्ताननेही त्यासाठी
योग्य वातावरण तयार व्हावे याची गांभीर्याने जबाबदारी घ्यावी, असे सांगितले. (वृत्तसंस्था)