- केंद्रीय मंत्र्याच्या मोलकरणीचा खून-

By Admin | Updated: June 29, 2015 00:38 IST2015-06-29T00:38:09+5:302015-06-29T00:38:09+5:30

केंद्रीय मंत्री नाईक यांच्या

- Union minister's assassination murder: | - केंद्रीय मंत्र्याच्या मोलकरणीचा खून-

- केंद्रीय मंत्र्याच्या मोलकरणीचा खून-

ंद्रीय मंत्री नाईक यांच्या
मोलकरणीची हत्या
तिसवाडी (गोवा) : केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या मोलकरणीचा रविवारी पहाटे सांपेद्र (जुने गोवा) येथे तिच्या घरात गळा दाबून खून करण्यात आला. चारू राथोड (४८) असे तिचे नाव असून ती नाईक यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर एका झोपडीत राहत होती.
रविवारी पहाटे ३.३० ते ६ दरम्यान ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. राथोड यांचा गळा आवळल्याच्या खुणा पोलिसांना आढळल्या आहेत. रामण्णा (५०) नावाच्या व्यक्तीने आपल्या आईचा खून केल्याचा दावा राथोड यांचा मुलगा कृष्णा (२१) याने केला आहे. त्याने पोलिसांतही तक्रार नोंदविली आहे.
राथोड या त्यांची दोन मुले व एका मुलीबरोबर सापेंद्र येथे राहत होत्या. संशयित रामण्णा याचे त्यांच्या घरी नियमितपणे येणे-जाणे होते. शनिवारी रात्रीही तो आला होता. त्या वेळी राथोड यांची मुले आणि रामण्णा यांच्यात वाद झाला होता. रामण्णा सकाळी कधी गेला, हे कोणालाही कळले नाही. दुसरीकडे राथोड सकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या मुलांना शौचालयात आढळल्या.
पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास राथोड शौचालयात गेल्या होत्या. तेव्हा त्यांची मुलगी जागी होती. त्यानंतर तिचा डोळा लागला. सकाळी सहाला जाग आल्यानंतर तिला तिची आई न दिसल्यामुळे ती बाहेर गेली. तेव्हा तिला आईचा मृतदेह शौचालयात आढळला. त्यानंतर तिने आक्रोश करीत भावांना उठविले. (प्रतिनिधी)

Web Title: - Union minister's assassination murder: