शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 22:30 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 

नवी दिल्ली, दि. 1 - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी म्हणजेच 3 सप्टेंबरला होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. काल रात्री उशिरा केंद्रीय कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रूडी मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे. याचबरोबर, गंगा शुद्धीकरण खात्याच्या मंत्री उमा भारती यांनीदेखील तब्येतीचे कारण पुढे करत आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यासोबतच केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान, कलराज मिश्र आणि महेंद्रनाथ पांडे यांनी देखील राजीनामा सादर केला आहे. सध्या या चौघांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.दरम्यान, आता केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सुद्धा आपल्याचा पदाचा राजीनामा दिला आहे. बंडारू  दत्तात्रेय हे तेलंगणातील सिकंदराबाद येथून लोकसभेवर निवडून आले आहेत. सध्या राजधानी दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराआधी अनेक मोठ्या घडामोडी सुरु आहेत. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूच्या नेत्यांचा समावेश मंत्रिमंडळात होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच अण्णा द्रमुकला मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याचे समजते. मात्र, अण्णा द्रमुकने यासाठी काहीसा वेळ मागितला असून, त्यामुळे सध्या केवळ मंत्रिमंडळात फेरबदल केला जाऊ शकतो. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौ-यावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

गडकरींकडे ‘रेल्वे’ जवळपास निश्चित..अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी फार दिवस राहणार नसल्याचे केलेले विधान व भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी मंत्र्यांची झालेली गर्दी यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा सुरू झाली. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रेल्वे खाते येऊ शकते. तर, सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात कायम ठेवून गंगा शुद्धीकरण आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. संरक्षण खात्याची जबाबदारी कोणाकडे येईल हे स्पष्ट नाही. 

टॅग्स :BJPभाजपा