शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

२०१९-२०२१ या तीन वर्षांत तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांची आत्महत्या; सरकारची संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:44 IST

देशात मागील तीन वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

नवी दिल्ली : देशात मागील तीन वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून, २०१९ ते २०२१ या कालावधीत तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. केंद्रीय मंत्री अब्बय्या नारायणस्वामी यांनी याबाबत संसदेत माहिती दिली. मात्र, देशात सामाजिक भेदभावामुळे आत्महत्या करणाऱ्या अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांची संख्या स्पष्ट झाली नाही.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री अब्बय्या नारायणस्वामी यांनी लोकसभेत सामाजिक भेदभावामुळे आत्महत्या करणाऱ्या एससी-एसटी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले की, आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०,३३५ एवढी होती. हा आकडा २०२० मध्ये १२,५२६ वर पोहचला आणि २०२१ मध्ये १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असल्याची नोंद आहे. अब्बय्या नारायणस्वामी यांनी मंगळवारी लोकसभेत सामाजिक भेदभावामुळे आत्महत्या करणाऱ्या एससी-एसटी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

मृतांच्या संख्येत वाढ तसेच उच्च शिक्षण विभागाने देशभरातील संस्थांमध्ये समुपदेशन कक्ष आणि एससी-एसटी विद्यार्थी सेल, समान संधी सेल, विद्यार्थी तक्रार कक्ष यांसारख्या विविध यंत्रणा आणि संपर्क अधिकारी नेमले आहेत, असे सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी उचललेल्या पावलांवर केंद्रीय मंत्री नारायणस्वामी यांनी नमूद केले. आकडेवारीनुसार, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढले आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये २१९१ मृतांची वाढ झाली तर २०२१ मध्ये २०२० च्या तुलनेत मृतांच्या संख्येत ५६३ ने वाढ झाली. 

टॅग्स :ParliamentसंसदStudentविद्यार्थीDeathमृत्यू