शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"मी खासदार आणि पत्नी आमदार, तरीही मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही", केंद्रीय मंत्र्याची खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 15:53 IST

आज अंमली पदार्थांचे व्यसन हा देशात मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

नवी दिल्ली : माझ्या मुलाचा जीव व्यसन केल्यामुळे गेला, त्यामुळे कोणत्याही आई-वडिलांनी आपले मूल व्यसनामुळे गमावू नये अशी माझी इच्छा आहे, असे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी म्हटले आहे. मी माझा मुलगा फक्त यासाठी गमावला आहे कारण तो व्यसनाच्या विळख्यात अडकला होता, असेही त्यांनी म्हटले. खरं तर मंत्री कौशल कुमार यांनी मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समर्थन केले. उमा भारती यांचा प्रयत्न समाजाला दिशा देणारा असून लोकांचा जीव वाचवणारा आहे असे मंत्री किशोर यांनी म्हटले.

"आज अंमली पदार्थांचे व्यसन हा देशात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांना देशातून पळवून लावले, पण जाताना त्यांनी देशात व्यसनाचे जाळे सोडले. वेगवेगळ्या व्यसनाच्या सेवनामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळेच निरोगी राहायचे असेल तर व्यसनाला नाही म्हणा. त्यामुळे मी आवाहन करतो की, त्यापासून दूर राहा", अशा शब्दांत सौरभ कुमार यांनी तरूणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. खरं तर अलीकडेच केंद्रीय मंत्री जबलपूरला गेले होते. यावेळी त्यांनी अमली पदार्थांबाबत अनेक गोष्टींवर भाष्य केले. 

"मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही"केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनीही याबाबत ट्विट केले आहे की, "मी स्वत: खासदार झालो आणि माझी पत्नी आमदार झाल्यानंतरही मी माझ्या मुलाचे आयुष्य व्यसनापासून वाचवू शकलो नाही, पण आता कोणत्याही आई-वडिलांनी आपले मूल व्यसनामुळे गमावू नये अशी माझी इच्छा आहे. व्यसनामुळे कोणतीही महिला विधवा होऊ नये, व्यसनामुळे कोणतेच मूल पितृहीन होऊ नये."

केंद्रीय मंत्र्याची खदखद आपल्या मुलाला अंमली पदार्थांचे व्यसन कधी लागले हे कळलेही नाही, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. यामुळे त्याची प्रकृती ढासळू लागली. त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता त्याचे यकृत खराब झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला आणि 2020 मध्ये त्याचा मृत्यू झाला. केंद्रीय मंत्री यांनी म्हटले की, त्याच्या अंत्यसंस्काराला प्रज्वलित करत असताना, त्यांनी संकल्प केला की मी आता अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सक्रियपणे सहभागी होईल आणि लोकांना त्यापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करेल. तेव्हापासून ते सातत्याने लोकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करत आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

  

टॅग्स :ministerमंत्रीDrugsअमली पदार्थMember of parliamentखासदारBJPभाजपाalcohol prohibition actदारुबंदी कायदा