केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावर हल्ला
By Admin | Updated: October 19, 2016 19:43 IST2016-10-19T19:41:29+5:302016-10-19T19:43:55+5:30
केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केल्याची घटना

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावर हल्ला
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 19 - केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या ताफ्यावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये ही घटना घडली. दगडफेक करण्यात आल्याने यामध्ये सुप्रियो हे किरकोळ जखमी झाल्याचंही वृत्त आहे. तृणमुल कॉंग्रेसने हा हल्ला केल्याचा संशय सुप्रियो यांनी व्यक्त केला आहे.
आसनसोलमध्ये एका रॅलीमध्ये सुप्रीयो हे आले असताना तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. यावेळी एक दगड सुप्रियो यांनाही लागला त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर घटनास्थळी तृणमुल कॉंग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झडप झाली. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.