शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

हा केवळ अपघात नाही, मला ठार मारण्याचा प्रयत्न- अनंत कुमार हेगडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2018 08:38 IST

ट्रक चालकाची चौकशी सुरू

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आहे. कर्नाटकमधील हलगेरीमध्ये ही घटना घडली आहे. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. 'हा अपघात नसून घातपात होता', अशी शंका हेगडे यांनी व्यक्त केली आहे. मला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 'ट्रक चालकानं जाणूनबुजून माझ्या गाडीला धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकची धडक दुसऱ्या गाडीला बसली', असा दावा हेगडे यांनी केला. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. माझ्या गाडीचा वेग जास्त असल्यानं मी बचावलो, असं हेगडे यांनी सांगितलं. 

अपघातात हेगडे यांच्या एका कर्मचाऱ्याला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती हेगडे यांनी दिली. अपघातानंतर लोकांनी ट्रक चालकाला पकडलं. त्याचं नाव नासिर असं आहे. अपघातावेळी नासिर मद्यधुंद अवस्थेत नव्हता. हेगडे यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

 

या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन ट्रक चालकाची सखोल चौकशी करावी, असं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं आहे. यामागे एखादं मोठं कारस्थान असावं, अशी शंका हेगडे यांनी व्यक्त केली आहे. पोलीस लवकरच या कारस्थानाचा पर्दाफाश करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातAnantkumar Hegdeअनंतकुमार हेगडे