शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १० पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 06:48 IST

उत्कृष्ट तपासकार्याचा गौरव; देशातील १२१ पोलीस अधिकारी मानकरी

दिल्ली : उत्कृष्ट तपास केल्याबद्दल यंदा देशातील १२१ पोलीस अधिकारी केंद्रीय गृहमंत्री पदकाचे मानकरी ठरले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या दहा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या पदकांची घोषणा करण्यात आली.या पोलीस अधिकाºयांमध्ये सीबीआयचे १५ जण, मध्यप्रदेश व महाराष्ट्राचे प्रत्येकी दहा पोलीस अधिकारी, उत्तर प्रदेशमधील आठ, केरळ व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ७ पोलीस अधिकारी आहेत. बाकी पोलीस अधिकारी अन्य राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील आहेत. गृहमंत्री पदक जाहीर झालेल्यांमध्ये २१ महिला पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री पदक ९६ पोलीस अधिकाºयांना जाहीर झाले होते. त्यामध्ये १३ महिला पोलीस अधिकाºयांचा समावेश होता. गुन्ह्यांचा तपास तत्परतेने व अतिशय कौशल्याने केला जावा व उत्कृष्ट तपास करणाºया अधिकाºयांना गौरविण्यात यावे, या उद्देशाने २०१८ सालापासून केंद्रीय गृहमंत्रीपदक देण्यास प्रारंभ झाला. त्यावर्षी १०१ पोलीस अधिकाºयांना या पदकाने सन्मानित करण्यात आले होते.यंदाचे महाराष्ट्रातील दहा मानकरी(१) सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, (२) पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकाडे, (३) पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे, (४) वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, (५) पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, (६) पोलीस उपअधीक्षक अनिल घेर्डीकर, (७) पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, (८) सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, (९) सहायक पोलीस आयुक्त किसान गवळी, (१०) पोलीस निरीक्षक कोंडिराम पोपरे.

टॅग्स :Policeपोलिस