शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कंपन्यांना दरवर्षी आपल्या ताफ्यात ११० विमानं समाविष्ट करावी लागतील : ज्योतिरादित्य शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 11:16 IST

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी कोरोनाच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) प्रभावित झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा व्यक्त केली आहे.

Minister Jyotiraditya Scindia : नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी कोरोनाच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) प्रभावित झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा व्यक्त केली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर भारतीय कंपन्यांना त्यांच्या ताफ्यात दरवर्षी ११० ते १२० नवीन विमाने सामील करावी लागतील. विंग इंडिया २०२२ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते. "कंपन्यांना अनेक नवीन जागतिक क्षेत्रांमध्ये उड्डाणास सुरुवात करायची असल्यास त्यांना त्यांच्या ताफ्यात मोठ्या आकाराची विमाने समाविष्ट करावी लागतील," असं ते यावेळी म्हणाले.

"पुढील वर्षापर्यंत देशांतर्गत प्रवाशांची संख्या दररोज ४.१० लाख प्रवासी इथपर्यंत पोहोचेल. २०२४-२५ पर्यंत प्रवाशांची संख्या विक्रमी पातळीवर जाईल," अशी आशा ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली. “भारताचे विमान वाहतूक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहे. ना केवळ विमान कंपन्यांची संख्या वाढत आहे, तर विमानतळांची संख्याही वाढत आहे. अशातच कंपन्यांना आपल्या ताफ्यात नव्या विमानांचा समाविष्ट करणं आवश्यक असेल, असंही ते म्हणाले.

"२०१३-१४ मध्ये सर्व कंपन्यांकडे मिळून ४०० विमानं होती. परंतु गेल्या वर्षी ती वाढून ७१० झाली. सध्या भारतात ९ हजारांपेक्षा अधिक वैमानिक आहेत आणि यापैकी १५ टक्के महिला आहेत. ही संख्या जागतिक प्रमाणापेक्षा पाच टक्के अधिक आहे," असंही ते म्हणाले. भारताला पुढील २ दशकांमध्ये २२०० विमानांची गरज भासेल असं युरोपियन कंपनीला वाटत असल्याचं एअरबसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं गुरूवारी सांगितलं होतं.

प्रवाशांची संख्या वाढतेय"देशांतर्गत दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ३९ लाख होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान ती घसरून ११ लाख झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा ही संख्या ३८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांबद्दल सांगायचं झालं तर २०१८-१९ मध्ये ती सहा कोटी होती, परंतु कोरोनानंतर ती संख्या घसरून १ कोटी झाली," असंही शिंदे म्हणाले. २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरू झाल्यावर अन्य देशांशी पुन्हा जोडले जाऊ असंही ते म्हणाले.

टॅग्स :airplaneविमानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेIndiaभारत