शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; जाणून घ्या, कोठे खर्च होणार 64 हजार कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 15:44 IST

atmanirbhar swasth bharat yojana : या आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि 3,382 ब्लॉकमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना केली जाईल.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला (Atmanirbhar Swasth Bharat Yojana) केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे. ही योजना जवळपास 64 हजार कोटी रुपयांची आहे. याबाबतची माहिती बुधवारी सूत्रांनी दिली आहे. या आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि 3,382 ब्लॉकमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना केली जाईल.

आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा आर्थिक वर्ष 21-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात सहा वर्षांच्या (आर्थिक वर्ष 25-26 पर्यंत) सुमारे 64,180 कोटी रुपयांच्या खर्चासह करण्यात आली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे राष्ट्रीय आरोग्य अभियाना व्यतिरिक्त असणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये-1) हाय फोकस 10 राज्यांमध्ये 17,788 ग्रामीण आरोग्य आणि कल्याण केंद्रांसाठी सहाय्यता.2) सर्व राज्यांमध्ये 11,024 शहरी आरोग्य आणि कल्याण केंद्रांची स्थापना.3) सर्व जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना आणि 11 हाय फोकस राज्यांमध्ये 3382 ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्स.4) 602 जिल्हे आणि 12 केंद्रीय संस्थांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकची स्थापना.5) नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी), त्याच्या 5 प्रादेशिक शाखा आणि 20 महानगर आरोग्य देखरेख युनिट्स मजबूत करणे.6) सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांना जोडण्यासाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकात्मिक आरोग्य माहिती पोर्टलचा विस्तार.7) 17 नवीन सार्वजनिक आरोग्य युनिट्सचे संचालन आणि 33 विद्यमान सार्वजनिक आरोग्य युनिट्स मजबूत करणे, जे 32 विमानतळ, 11 बंदरे आणि 7 लँड क्रॉसिंगवर आहेत.8) 15 आरोग्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रे आणि 2 मोबाईल हॉस्पिटलची स्थापना.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार