शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

केंद्रीय मंत्रिमंडळात पुनर्रचनेची चर्चा, संसदेचे अधिवेशन जुलैअखेर, भाजपमध्ये संघटनात्मक बदलांचीही कुजबुज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 07:11 IST

Union Cabinet reshuffle? : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणावे की नाही यावरही चर्चाही झाली आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत वेगाने होत असलेली घट, लसीकरणाने घेतलेला वेग आणि जुलै महिन्यात संसदेच्या होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची पुनर्रचना आणि भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासाठी सरकार आणि संघ परिवारातील अतिउच्च पातळीवर विचारविनिमय सुरू आहे.

नेतृत्वाला सध्या तीन महत्वाच्या विषयांवर निर्णय घ्यायचा आहे. तीन विद्यमान आमदार सर्बानंद सोनोवाल (आसाम), त्रिवेंद्र सिंह रावत (उत्तराखंड) आणि मुकुल रॉय (पश्चिम बंगाल) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात आणण्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. सोनोवाल हे आसामचे मुख्यमंत्री होते. ते विद्यमान आमदार असूनही त्यांना मुख्यमंत्रिपद नाकारले गेले. रावत यांना राज्यात विधानसभा निवडणूक जवळ आली असताना ८ महिने आधी मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यात आले. तर पश्चिम बंगालमध्ये भाजप बळकट करण्यात मुकुल राॅय यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात जागा देण्याचा विचार सुरु आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणावे की नाही यावरही चर्चाही झाली आहे. जनता  दल (यु) मोदी मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही तसेच मंत्रिमंडळाचा भाग होता त्या लोकजनशक्ती पक्षाबद्दल निर्णय भाजपला घ्यायचा आहे. पंजाबमध्ये भाजपपासून वेगळा झालेल्या अकाली दलाबद्दलही धोरण ठरवावे लागणार आहे. 

याशिवाय बिहारच्या उप मुख्यमंत्री पदावरून दूर करून राज्यसभेत आणलेले सुशील मोदी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना काही पद दिले जाणार की नाही याबाबतही निर्णय घ्यावा लागेल. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून तेथे पक्ष बळकट करण्यासाठी सरकारमध्ये वरूण गांधी यांना सामावून घेण्याचा प्रस्तावही आहे.

डॉ. देवी शेट्टींना मिळणार संधी? कोरोना महामारीविरोधातील मोहिमेत साह्य करण्यासाठी बाहेरून आरोग्य विषयातील तज्ज्ञाला मंत्रिमंडळात आणण्याचा विचार सरकार करू शकते, अशा चर्चा आहेत. खासगी रुग्णालयांची साखळी चालवणारे डॉ. देवी शेट्टी यांचे नाव यासाठी चर्चेत आहे. हरदीप सिंग पुरी (गृह निर्माण आणि नागरी उड्डयन),  एस. जयशंकर (परराष्ट्र व्यवहार) आणि आर. के. सिंह (उर्जा) यांच्याप्रमाणेच शेट्टी यांना बाहेरून सामावून घेतले जाऊ शकते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसदBJPभाजपाPoliticsराजकारण