शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय कॅबिनेटची उद्या बैठक, जम्मू-काश्मीरला मिळणार मोठं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 20:15 IST

केंद्रीय कॅबिनेटची बुधवारी एक विशेष बैठक होणार आहे.

नवी दिल्लीः केंद्रीय कॅबिनेटची बुधवारी एक विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकार जम्मू-काश्मीरला मोठं गिफ्ट देऊ शकते. तत्पूर्वी मंगळवारी केंद्रीय गृह सचिव ए. के. भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली आहे. या बैठकीत जम्मू-काश्मीरमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनुसार, या बैठकीत वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी सहभागी होते. या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारच्या योजनांना कार्यान्वित करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे. तसेच राज्यात सामान्य स्थिती आणण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजित केलं आहे. आता ही प्रक्रिया पुढे नेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वाटपावरही चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीचं अध्यक्ष स्थान केंद्रीय गृहसचिव भल्ला यांनी भूषवलं आहे.  31 ऑक्टोबरला अस्तित्वात आले दोन केंद्रशासित प्रदेशकेंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन सुरू आहे. त्यासाठी अधिनियम लागू करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. केंद्रीय वित्त, कृषी आणि ग्रामीण विकास, उद्योगासहीत मोठी मंत्रालयं आणि विभागातील 15हून अधिक सचिव बैठकीत उपस्थित होते.  विकास कार्यक्रम आणि संपत्ती, कर्मचाऱ्यांच्या वाटपावर चर्चा केली जाणार आहे. काही टीमनं केला श्रीनगरचा दौराकेंद्र सरकारनं अधिकाऱ्यांच्या काही टीम श्रीनगरचा दौरा करून झाल्या आहेत. तर संयुक्त सचिव आणि सचिवस्तरावरील काही टीम आगामी आठवड्यात काश्मीरचा दौरा करणार आहेत. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी घोषणा केलेल्या 85 विकास योजनांना राबवण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासन मदत करणार आहे. तीन समित्याचं झालं गठनजम्मू-काश्मीरच्या प्रशासनानं राज्याच्या विभाजनावर काम करण्यासाठी तीन समित्या गठीत केल्या आहेत. या तिन्ही समित्या जम्मू-काश्मीरच्या विकासावर काम करत आहेत. तिन्ही समित्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, त्यानुसार त्या समित्या काम करत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा