शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

केंद्रीय मंत्रिमंडळाचा फेरबदल लांबणीवर , अद्रमुकला वेळ हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 03:23 IST

केंद्रीय मंत्रिमंडळात सप्टेंबरच्या प्रारंभी करण्यात येणारा प्रस्तावित बदल लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत, असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन व म्यानमारच्या दौ-यावर जात असून

हरीश गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात सप्टेंबरच्या प्रारंभी करण्यात येणारा प्रस्तावित बदल लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत, असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन व म्यानमारच्या दौ-यावर जात असून, ते परतल्यावरच मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदल केले जातील, असेही संकेत मिळत आहेत.राष्टÑपती रामनाथ कोविंद हे १-३ सप्टेंबरदरम्यान तिरुपती बालाजी व गुजरातेतील साबरमती आश्रमाला भेट देणार आहेत. ते २ सप्टेंबरला सायंकाळी दिल्लीत परततील व पुढील दिवशी गुजरातेत जातील.डोकलामचा तिढा काल सुटल्याने पंतप्रधान मंत्रिमंडळाचा विस्तार व फेरबदल लगेच करण्याची तसेच नवा संरक्षणमंत्री नियुक्त करण्याची घाई करण्याची शक्यता नाही. या कामासाठी ते आता भाजप अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली व संघ नेतृत्वाशी व्यापक विचारविनिमय करून निर्णय घेतील. संघाची सहा महिन्यांनी होणारी दोनदिवसीय आढावा बैठक मथुरेत २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामध्ये भाजपसह संघ परिवारातील संघटनांचे नेते सहभागी होत आहेत.अद्रमुकचे किमान पाच मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होणार आहेत, अशी चर्चा आहे. असे असले तरी त्या पक्षातील अंतर्गत भांडणे अद्याप संपलेली नाहीत. त्यांना आधी अंतर्गत भांडणे संपवावी लागतील व नंतरच पुढील वाटचाल करावी लागेल. जद (यू)चे दोन सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याचे निश्चित झाले आहे. भाजप नेतृत्वाला उत्तर प्रदेशातील स्थितीचाही सामना करावा लागत आहे. या राज्यातील योगी सरकारमधील मुख्यमंत्र्यांसह पाच सदस्य ना विधानसभेचे सदस्य आहेत ना विधान परिषदेचे. विधान परिषदेत केवळ चार जागा रिक्त आहेत व त्या सर्व जागा भाजप जिंकेल; परंतु पाचव्या मंत्र्याचे काय करायचे, हा पेच आहे.पंतप्रधान मोदी हे ३ सप्टेंबर रोजी चीनच्या दौºयावर जात असून, ते ७ सप्टेंबर रोजी परतणार आहेत. त्यामुळे फेरबदल व विस्तार झालाच तर तो २ सप्टेंबरच्या सायंकाळी होऊ शकेल; अन्यथा ६ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरदरम्यान तो होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूGovernmentसरकारBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह