शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्रिमंडळाने 'इंडिया' शब्द हटवला? रेल्वेच्या प्रस्तावात सर्वत्र 'भारत'चा उल्लेख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 18:11 IST

रेल्वे मंत्रालयाचा हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिला प्रस्ताव आहे, ज्यामध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' हा शब्द वापरण्यात आला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या प्रस्तावात रेल्वे मंत्रालयाने 'इंडिया' ऐवजी 'भारत' हा शब्द वापरला आहे. केंद्र सरकार 'इंडिया' ऐवजी 'भारत' नावाला प्राधान्य देत असताना रेल्वे मंत्रालयाने हा बदल केला आहे. अनेक संस्था त्याचा प्रचारही करत आहेत. रेल्वे मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, आपल्या संविधानात 'इंडिया' आणि 'भारत' या दोन्ही नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मंत्रिमंडळाच्या प्रस्तावात 'भारत' हे नाव वापरणे कोणत्याही प्रकारे चुकीचे नाही.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाचा हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिला प्रस्ताव आहे, ज्यामध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' हा शब्द वापरण्यात आला आहे. लॉजिस्टिक कॉस्टपासून ते कार्गो आणि इतर गोष्टींचा उल्लेख करताना 'भारत' हा शब्द सर्वत्र वापरला गेला आहे. रिपोर्टनुसार, आगामी काळात केंद्र सरकारच्या सर्व कागदपत्रांमध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' हा शब्द वापरण्यात येणार आहे.

दुसरीकडे, 'भारत' हे शतकानुशतके जुने नाव आहे. 'भारत' हे नाव सात हजार वर्षे जुन्या विष्णु पुराणसारख्या प्राचीन ग्रंथात वापरले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्व पाठ्यपुस्तकांमधील 'इंडिया' नाव बदलून 'भारत' करण्याची शिफारस गेल्या बुधवारी एनसीईआरटीच्या एका समितीने एकमुखाने पारित केली. 

एनसीईआरटीने ही शिफारस स्वीकारल्यास नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये तसा बदल दिसण्याची शक्यता आहे. पद्मश्री सी.आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखालील एनसीईआरटीच्या समाजशास्त्रावरील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत 'इंडिया' ऐवजी 'भारत' नाव करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. दिल्लीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या जी-२० देशांच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'इंडिया' ऐवजी 'भारत'  नावाचा अवलंब केला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत