शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

Union Budget 2022: मानसिक तणावातून मुक्ती, नॅशनल टेलिमेंटल सेंटर सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 13:37 IST

Union Budget 2022: निर्मला सितारमण यांनी बजेट 2022 मध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, डिजिटल पेमेंटसाठी यंत्रणा, वन नेशन वन रेशन, 5 जी सेक्टर, ई-एज्युकेशनसाठी चॅनेल्स, ई-पासपोर्ट यांसारख्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात 2047 पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत 'पीएम गतिशक्ती योजने'च्या 'मास्टर प्लान'वर सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य करदात्यांना कुठलिही सवलत मिळाली नाही. त्यामुळे, सर्वसामान्यांची निराशाच झाली आहे. सितारमण यांनी डिजिटल यंत्रणांवर लक्ष केंद्रीत करत अनेक योजनांची घोषणा केली. त्यात, मानसिक आरोग्यसाठी नॅशनल टेलीमेंटल सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

निर्मला सितारमण यांनी बजेट 2022 मध्ये मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये, डिजिटल पेमेंटसाठी यंत्रणा, वन नेशन वन रेशन, 5 जी सेक्टर, ई-एज्युकेशनसाठी चॅनेल्स, ई-पासपोर्ट यांसारख्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. तर एटीएम, नेटबँकिंग, पेमेंट अॅप्सद्वारे टपाल बचत इंटरऑपरेबल करून ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण लोकांची सोय केली जाणार आहे. RuPay आणि UPI द्वारे एमडीआर फीमध्ये सबसिडी देण्याचा निर्णय एक सकारात्मक पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे. 

सितारमण यांनी नॅशनल टेलीमेंटल सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. आयआयटी बंगळुरूच्या माध्यमातून तांत्रिक सुविधा पुरविण्यात येतील. त्यामध्ये, आरोग्य योजना आणि आरोग्य सुविधांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येईल. विशेष आरोग्य ओळख आणि उत्तम आरोग्य सेवांची पूर्तता निश्चित करण्यात आली आहे. कोरोना कालावधीत अनेकांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम झाला आहे. एका आकडेवारीनुसार मानसिक आरोग्यावर परिणाम झालेल्या 40 ते 60 टक्के रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच, आरोग्याप्रति जागरुक राहण्यासाठी सरकारकडून नॅशनल टेलीमेंटल सेंटर सुरू करण्यात येत आहे. 

या सेंटरद्वारे लोकांच्या मानसिक समस्या आणि त्यांचे कॉन्सलिंग ऑनलाईन पद्धतीने होईल. याबाबत सविस्तर योजना कशारितीने कार्यान्वित होईल, हे हळुहळु स्पष्ट होईल. दरम्यान, मनोरुग्ण तज्ज्ञांकडून या योजनेचं स्वागत करण्यात आलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMental Health Tipsमानसिक आरोग्यBudgetअर्थसंकल्प 2022Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019