जुने बसस्थानक परिसरात अनोळखीचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: May 13, 2016 22:35 IST2016-05-13T22:35:53+5:302016-05-13T22:35:53+5:30

जळगाव : शहरातील जुने बसस्थानक परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Unidentified bodies found in the old bus stand area | जुने बसस्थानक परिसरात अनोळखीचा मृतदेह आढळला

जुने बसस्थानक परिसरात अनोळखीचा मृतदेह आढळला

गाव : शहरातील जुने बसस्थानक परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जुने बसस्थानक परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ एक अंदाजे ५० वर्ष वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळून आला. हा इसम भिक्षुक असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचा मृत्यू कशामुळे झाला? याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी दिनेश बागुल (रा.मोहननगर, जळगाव) यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १७४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल प्रदीप बडगुजर करीत आहेत.

Web Title: Unidentified bodies found in the old bus stand area