कोकणगाव येथे आढळला अज्ञात मृतदेह

By Admin | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:34+5:302015-07-10T23:13:34+5:30

ओझर टाऊनशिप : कोकणगाव येथील अंगणवाडीच्या नवीन बांधकामातील खोलीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बुधवारी ओझर पोलिसांना मिळून आला.

Unidentified bodies found in Kokangaon | कोकणगाव येथे आढळला अज्ञात मृतदेह

कोकणगाव येथे आढळला अज्ञात मृतदेह

र टाऊनशिप : कोकणगाव येथील अंगणवाडीच्या नवीन बांधकामातील खोलीत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बुधवारी ओझर पोलिसांना मिळून आला.
या घटनेविषयी ओझर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित धाव घेऊन मृतदेह असलेल्या ठिकाणाचा पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, परंतु ओळख पटली नाही. मृतदेह पिंपळगाव येथील रुग्णालयात पाठविला. मृत व्यक्तीचे वय ३० ते ३२ वर्षे असून त्याची उंची साडेपाच फूट, शरीराने मध्यम, रंगाने सावळा, चेहरा गोल, डोक्यावरील केस काळे व दोन इंच वाढलेले, अंगात पांढरा बनियन, काळी जीन्स पँट व कमरेला मळकट शर्ट गुंडाळलेला आहे. अशा वर्णनाच्या व्यक्तीबद्दल कोणास माहिती असल्यास त्यांनी हवालदार विश्वास देशमुख यांच्याशी अथवा ओझर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन ओझर पोलिसांनी केले आहे.
---

Web Title: Unidentified bodies found in Kokangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.