मधुचंद्राच्या वाटेवर नववधूचा दुर्दैवी अंत
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:03+5:302015-02-20T01:10:03+5:30
( ऋचा निंबर्तेचा फोटो रॅपवर टाकला आहे)

मधुचंद्राच्या वाटेवर नववधूचा दुर्दैवी अंत
( चा निंबर्तेचा फोटो रॅपवर टाकला आहे)मधुचंद्राच्या वाटेवर नववधूचा दुर्दैवी अंतपती जखमी : कार दरीत कोसळलीनागपूर : लग्नानंतर सिमला येथे मधुचंद्रासाठी जाणाऱ्या छोटी धंतोली येथील नवदाम्पत्याची कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात नववधू जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजता घडली. लग्नाला दहा दिवसही उलटले नसताना ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.राहुल निंबर्ते (२४) आणि ऋचा माटे (२०) रा. छोटी धंतोली यांचे ९ फेब्रुवारी २०१५ रोजी सेंट्रल बाजार रोडवरील गणेश लॉन बजाजनगर येथे विवाह झाला. लग्नानंतर ते मधुचंद्रासाठी सिमला येथे जात होते. नागपूरवरून विमानाने ते दिल्लीला गेले. तेथून ते इनोव्हा कारने सिमल्याला जात होते. सिमल्याला जाण्यापूर्वी दोन किलोमीटरपूर्वी त्यांची इनोव्हा कार दरीत कोसळली. या अपघातात नववधू ऋचाचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती राहुल आणि इनोव्हा गाडीचा चालक जखमी झाले. त्यांना सिमल्याच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी नागपुरात धडकताच कुटुंबात शोककळा पसरली.