पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:22+5:302015-03-06T23:07:22+5:30
नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील पाटील मळा परिसरात राहणार्या दीड वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़५) दुपारी घडली़ पाटील मळा परिसरात हिरामण पागे हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात़ गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचा दीड वर्षांचा मुलगा विशाल हा अंगणात खेळत होता़ या अंगणाला लागूनच असलेल्या पाण्याच्या टाकीत डोकावताना तोल जाऊन तो खाली पडला़ मुलगा पाण्याच्या टाकीत पडल्याचे लक्षात येताच पागे कुटुंबीयांनी विशालला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़ (प्रतिनिधी)

पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
न शिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील पाटील मळा परिसरात राहणार्या दीड वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़५) दुपारी घडली़ पाटील मळा परिसरात हिरामण पागे हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात़ गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचा दीड वर्षांचा मुलगा विशाल हा अंगणात खेळत होता़ या अंगणाला लागूनच असलेल्या पाण्याच्या टाकीत डोकावताना तोल जाऊन तो खाली पडला़ मुलगा पाण्याच्या टाकीत पडल्याचे लक्षात येताच पागे कुटुंबीयांनी विशालला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़ (प्रतिनिधी)